पुणे: खासदार संभाजीराजे भाेसले यांची आज पुण्यात पत्रकार परिषद घेतली. खासदार संभाजीराजे भोसले (Sambhaji Raje Bhosale) यांच्या खासदारकीचा (MP) कार्यकाळ संपली आहे. आता पुढील राजकीय वाटचाल काय असेल यावर त्यांनी भाष्य केलं आहे. विकासकामं करण्यासाठी राजसत्ता हवी असते असं ते म्हणाले आहे. (Sambhajiraje Chhatrapati Latest News)
यावेळी राज्यसभेची निवडणुक (RajyaSabha Election) लढवणार असल्याचं ते म्हणाले. ते अपक्ष म्हणून लढणार असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच यावेळी त्यांनी 'स्वराज्य' (Swarajya) या त्यांच्या नव्या संघटनेची घोषणा केली आहे. (Big news: Sambhaji Raje will contest Rajya Sabha elections independently; Announced his Swarajya Society )
हे देखील पाहा -
संभाजीराजेंनी आपल्या पत्रकार परिषदेत सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (PM Modi) आभार मानले. खासदारकीसाठी संधी दिली त्यासाठी त्यांनी मोदीचे आभार मानले तसेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेही त्यांनी आभार मानले आहे. संभाजीराजे म्हणाले की जनतेने छत्रपती घराण्यावर प्रेम केलं आणि त्या प्रेमामुळेच मी महाराष्ट्र पिंजून काढला.
गोंदिया जिल्हा सोडून मी पुर्ण महाराष्ट्र पिंजून काढलां. राज्यात फिरल्यावर मला कळलं की लोक का बरं शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्यावर प्रेम करतात. फडणवीस आणि मोदी यांनी मला बोलवून विंनती केली की तुम्ही राष्ट्रपती नियुक्त खासदार पद स्वीकारावं, त्यामुळे मी फडणवीस, मोदी आणि राष्ट्रपती यांना धन्यवाद व्यक्त करतो
पुढे ते म्हणाले की, मी नेहमी शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या ऑयडोलॉजी प्रमाणे काम केलं. ५ मे ला मी आजाद मैदानावर गेलो आणि तिथे मला मराठा समाजातील समन्वयकांनी मला विनंती केली की तुम्ही स्टेजवर जावं. तिथे कुणी जायला तयार नव्हतं तेव्हा मी त्या व्यासपीवर गेलो. तेव्हा मराठा समाज शांत झाला.
नाहीतर तिथे काय घडलं असतं हे तुम्हाला सांगायची गरज नाही. पण भाजपला वाटलं मी भाजप विरोधात भुमिका घेतली. मात्र माझी भूमिका राष्ट्रपती नियुक्त खासदार असल्यामुळे मी समाजाच्या हिताची भुमिका घेतली असंही संभाजीराजे म्हणाले आहेत.
पहिली मोठी घोषणा
यावेळी त्यांनी दोन मोठ्या घोषणा केल्या आहे. ते म्हणाले. आज मी दोन निर्णय घेतले आहेत. त्यातील पहिला निर्णय राज्यसभेसंबधीत आहेत. जुलैमध्ये राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार आहेत. मी राज्यसभेची निवडून निश्चित लढवणार आहे. राज्यसभेची निवडूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे. ही पहिली मोठी घोषणा त्यांनी केली.
याबद्दल ते म्हणाले की, मी जे काम केलं आहे, ते समाज हिताचं आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार म्हणून मला सर्वांनी मला पाठिंबा दिला पाहिजे. फक्त छत्रपती घराण्याचे वंशज म्हणुन नाही, तर मी केलेल्या कामामुळे मला पाठिंबा द्या असं आवाहन त्यांनी अपक्ष आमदारांना केलं आहे. त्याचप्रमाणे मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. मी अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणूक लढवणार असा उल्लेख त्यांनी केला.
दुसरी मोठी घोषणा
दुसरी मोठी घोषणा करताना संभाजीराजे म्हणाले की, शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणाऱ्या जनतेला एका छताखाली कसं आणाचं यासाठी माझा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही एक संघटना स्थापन केली आहे. 'स्वराज्य संघटना' नावाने ही संघटना आम्ही स्थापन केली आहे अशी दुसरी मोठी घोषणा त्यांनी केली आहे.
याबाबत ते म्हणाले की, हा माझ्या राजकीय वाटचालीचा पाहिला टप्पा असणार आहे. स्वराज्याला संघटीत ठेवायचं आहे. स्वराज्य संघटीत ठेवण्यासाठी मे महिन्यात माझा महाराष्ट्र दौरा आहे. माझी कुणाशीही चर्चा झाली नाही, मी कुणाला ही भेटलो नाही. लोकांना आवडलं म्हणुन मी इतर पक्षांपासून दूर आहे. लोकांना राजकारण विरहित छत्रपती पाहिजे आहे.
मी अजून माझ्या संघटनेचं चिन्ह, रंग, झेंडा कसा असावा हे निश्चत केलं नाही. मात्र रक्तात आणि ह्रुदयावरील केशरी पट्टा कुणी काढून घेऊ शकत नाही. राज्यसभा मला आवडते म्हणुन माझी राज्यसभेवर जायची इच्छा आहे. राज्यसभेत इंटेलेक्चुअल लोक असतात. इंटेलेक्चुअल लोकांत जायला कुणाची काय हरकत आहे असं संभाजीराजे म्हणाले आहेत.
Edited By - Akshay Baisane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.