मुंबई: राष्ट्रवादीचे (NCP) अध्यक्ष शरद पवार यांच्या साताऱ्यातील भाषणाचे व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. आता हा व्हिडिओ भाजपनेही (BJP) शेअर करुन शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. 'नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढले पवार (Sharad Pawar) नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात असा आरोप भाजपने केला आहे, यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार नेमके काय म्हणाले आहेत ते सांगितले आहे.
अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत या व्हिडिओत शदर पवार नेमक काय म्हणाले आहेत. ते सांगितले. साताऱ्यातील एका कार्यक्रमात शरद पवार यांनी भाषण केले होते. या कार्यक्रमात शरद पवार यांनी जवाहर राठोड यांची पाथरवट ही कविता वाचून दाखवली होती. याच कवितेवरुन सध्या वाद निर्माण झाला आहे.
हे देखील पाहा
काय आहे कविता?
तुमचा दगड धोंडा आमही आमच्या छन्नी आणि हातोड्याने फोडतो. त्यातून तुमच्या घरात अन्न तयार करायला. पिठ तयार करायला जे लागतं ते आम्ही घडवतो. ज्या जात्यातून पिठ निघतं त्याने तुमचं पोट भरतं. आज आम्ही अनेक गोष्टी घडवल्या. आमच्या छनीने, हातोड्याने आणि घामाने, तुम्ही ज्यांची पूजा करता त्या ब्रह्मा, विष्णू महेश यांच्या मूती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो, तुम्ही आम्हाला त्या मंदिरात येऊ देत नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की, ब्रह्मा, विष्णू आणि महेश आम्ही आमच्या हाताने घडवला. हा तुमचा देव, तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय सहन करणार नाही असं काव्य जवाहरनं लिहून ठेवल्याचं शरद पवारांनी (Sharad Pawar) सांगितले.
उपमुख्यमंत्री अजित पवार काय म्हणाले?
शरद पवार (Sharad Pawar) यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रीया दिली. शरद पवार यांनी एका कवीची कवीता वाचून दाखवली आहे. तुम्ही ते सर्व भाषण ऐका, यात कवीचा दाखला दिला आहे. विरोधकांनी तेवढाच व्हिडिओ कट करुन पसरवला आहे, असल राजकारण का करत आहात, साहेबांनी एक उदाहरण खातर ते सांगितलं आहे.
भाजपने काय आरोप केला?
भाजपने (BJP) ट्विट करुन शरद पवार यांच्यावर आरोप केला आहे. 'नास्तिक शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब ह्या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा' असं ट्विटमध्ये म्हटले आहे.
Edited By- Santosh Kanmuse
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.