Saif Ali Khan : सैफवर जीवघेणा हल्ला, उपस्थित झालेले १० प्रश्न, आणि त्यांची उत्तरे

Saif Ali Khan Stabbed : सैफ अली खान याच्यावर आज मध्यरात्री चोरट्याने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये सहा ते सात वार केले. सैफ अली खान याच्या मानेवर दहा सेंटीमीटरची जखम झाली आहे. सध्या सैफची प्रकृती स्थिर आहे.
Saif Ali Khan Stabbed case
Saif Ali Khan Stabbed case
Published On

Saif Ali Khan Stabbed case : अभिनेता सैफ अली खान याच्यावर चाकू हल्ला झाला. चोरट्याने मध्यरात्री वांद्रे येथील राहत्या घरात सैफ अली खान (Saif Ali Khan) याच्यावर सपासप ६ ते ७ वार केले. जखमी सैफ अली खानला लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. सैफ अली खान याची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. सैफ अली खान याच्यावर हल्ला झाल्यानंतर मुंबईसह राज्यात आणि बॉलिवूडमध्ये एकच खळबळ उडाली. सैफ अली खान याच्यावरील हल्ल्यासंदर्भात घटनेवर काही प्रश्न उपस्थित झाले आहेत, त्या प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊयात..

१. सैफ अली खान याच्यावर कधी हल्ला झाला ? When was Saif Ali Khan attacked?

सैफ अली खान याच्यावर वांद्रे येथील घरात मध्यरात्री साडेतीन वाजता हल्ला झाला.

२. सैफ अली खान कुठे राहतो ? Where does Saif Ali Khan live?

अभिनेता सैफ अली खान सतगुरु शरण इमारतीमध्ये आपल्या कुटुंबासोबत राहतो.

३. सैफ अली खान याच्यावर हल्ला का झाला? Why was Saif Ali Khan attacked?

अभिनेता सैफची पत्नी करिना कपूरने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, चोरी करण्यासाठी घरात आलेल्या व्यक्तीने सैफवर हल्ला केला. तो चोरीच्या उद्देशाने घरात आला होता. त्याला विरोध केल्यानंतर त्याने हल्ला केला.

Saif Ali Khan Stabbed case
Saif Ali Khan Health Update : सैफच्या मानेवर,हातावर सपासप वार, ६ जखमा, लिलावतीमध्ये सर्जरी

४. सैफ अली खान याच्यावर हल्ला कसा झाला ? How was Saif Ali Khan attacked?

सैफ अली खान याच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. सैफ अली खान कुटुंबाला वाचवण्यासाठी चोरासोबत भिडला होता. त्यावेळी चोराने त्याच्यावर सहा ते सात वेळा हल्ला केला. सैफ अली खान याच्या हातावर आणि मानेवर जखमा झाल्या होत्या, पाटीवरही सैफ अली खान याला जखम झाली, अशी माहिती रूग्णालयाने दिली.

५. सैफवर हल्ला झाला, तेव्हा करिना कपूर कुठे होती ? Where was Kareena Kapoor Khan at the time of the incident?

सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला त्यावेळी करिना कपूर आणि मुले (तैमूर, जेह) घरातच होते.

६. सैफशिवाय आणखी कुणाला दुखापत झाली ? Did anyone else suffer injuries in the attack?

या हल्ल्यात मोलकरीण जखमी झाली आहे.घरात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांपैकी एका महिला कर्मचाऱ्यावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात हाताला जखम झाली आहे. तिच्यावर रूग्णालयात उफचार सुरू आहेत. पोलिसांनी तिचा जबाब नोंदवला आहे.

Saif Ali Khan Stabbed case
मोठी बातमी! सैफ अली खानवर चाकू हल्ला, रूग्णालयात उपचार सुरू

७. सैफवरील हल्ल्यानंतर करीना कपूर खानने काय म्हटले? What Kareena Kapoor Khan said in her statement after the attack?

सैफ अली खान आणि करीना कपूर खान यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला. सैफच्या हाताला दुखापत झाली आहे. त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. कुटुंबातील इतर सदस्य व्यवस्थित आहेत. चाहत्यांनी आणि मीडियाने शांतता आणि संयमाची भूमिक घ्यावी. कोणत्याही प्रकाराच अंदाज बांधू नये. पोलिसांचा तपास योग्य त्या पद्धतीने सुरू आहे. तुमच्या काळजीबद्दल सर्वांचे आभार.

८. सैफ अली खान याच्या हल्ल्यासंदर्भात पोलीस काय म्हणाले ? What has the police said on the incident so far?

सैफ अली खान याच्या घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. घरफोडीचा प्रयत्न करण्यापूर्वी हल्लेखोर आधीच घरात असल्याचा संशय असल्याचेही पोलिसांनी सांगितले.

९. सैफ अली खान याची प्रकृती सध्या कुठे आहे? Is Saif Ali Khan doing better now?

सैफ अली खान याच्यावर लिलावती रूग्णालयात दोन शस्त्रक्रिया झाल्या. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती कॉस्मॅटिक सर्जरी स्पेशालिस्ट यांनी दिली.

Saif Ali Khan Stabbed case
Saif Ali Khan: पतौडी पॅलेस ते महागड्या गाड्या; बॉलिवूडचा नवाब आहे कोट्यवधींचा मालक, संपत्तीचा आकडा ऐकून डोळे भिरभिरतील

१०. सैफ कधी रिकव्हर होणार, डॉक्टर काय म्हणाले? What have doctors said on Saif Ali Khan’s recovery?

सैफ अली खान याच्यावर चाकूशिवाय इतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला. त्याला सहा जखमा झाल्या आहेत, त्यापैकी दोन जखमा खोल आहेत.त्यामधील एक जखम मानेच्या जवळ आहे. शस्त्रक्रिया केल्यानंतर मणक्यामधून एक धारधार शस्त्राचा तुकडा बाहेर काढण्यात आलाय. डॉ. नितीन डांगे, डॉ. लीना जैन, डॉ. निशा गांधी, डॉ. कविता श्रीनिवास, डॉ. मनोज देशमुख या डॉक्टरांच्या देखरेखीखाली सैफ अली खान याच्यावर उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com