पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे (Rupali Patil-Thombare) यांनी पक्षातील सर्व पदांचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्याकडे मनसेच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी होती. पक्षांतर्गत वादामुळे त्यांनी मनसेला (MNS) रामराम ठोकला आहे. त्यामुळे ऐन महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला पुणे (Pune) शहरात मोठे खिंडार पडले आहे. रुपाली पाटील या मनसेच्या एक निष्ठावंत कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात.
हे देखील पहा-
मनसे मध्ये निस्वार्थी कार्यकर्ते आहे, त्यांनी मला भरभरून प्रेम दिले आहे. त्यांची ऋणी राहीन, बदल कोणात घडत नसेल तर मी माझा बदल केलेला आहे. 14 वर्ष मी काम केले आहे, मनधरणी अनेकांनी केली. नवीन पक्षात जाणार हे अद्याप मी ठरवलेले नाही, अनेकांच्या ऑफर(Offer) आलेल्या आहेत, निर्णय लवकरच जाहीर करणार आहे. राज ठाकरे माझे दैवत होते आणि आहेत. 14 वर्ष काम करत असताना मला तारेवरची कसरत करावी लागली.
माझ्यामुळे पक्षाला त्रास होणार असेल, तर मी माझा निर्णय घेतलेला बरा आहे. 14 वर्षात पक्षाने मला खूप काही दिले आहे. माझा वाद यावरुन नाही की मला काय दिले आणि काय दिले नाही माझ्या वैयक्तिक कारणासाठी मी राजीनामा दिला आहे. माझ्या काम करण्याच्या पद्धतीसह जे मला स्वीकारतील त्या पक्षात मी जाणार आहे. आता राष्ट्रवादी (NCP) आणि शिवसेना (Shiv Sena) समोर आहे. मला जर जायचं असतं तर 2019 ला मी निर्णय घेतला असता.
माझ्यावर ही वेळ का आली याची कल्पना तुम्हालाही माहिती आहे. त्याबद्दल मला काहीही बोलायचे नाही. भाजपची अद्याप ऑफर नाही. मी बेधडक होते आणि आहे. पक्ष सोडण्याच्या भावना इमोशनल आहेत. रिकामटेकड्या नेत्यांमुळे रुपाली पाटीलवर ही वेळ आली त्यांना योग्य वेळी उत्तर देईल, राज ठाकरे (Raj Thackeray) पुणे दौऱ्यावर आहेत. फोन आल्यावर बघू, राज ठाकरेंना भेटायला कधीही आवडेल.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.