संतापजनक! अल्पवयीन मुलीवर रिक्षाचालकाचा अत्याचार; आरोपी अटकेत

दीपक हिवाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीशी आरोपी दीपक हिवाळे याची सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती.
Crime News
Crime Newsअजय दुधाने

उल्हासनगर - उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar) एक संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन मुलीवर 35 वर्षीय रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी विठ्ठलवाडी पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रिक्षाचालक आरोपीला अटक केली आहे. दीपक हिवाळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीशी आरोपी दीपक हिवाळे याची सहा महिन्यांपूर्वी ओळख झाली होती.

हे देखील पहा -

त्यानंतर त्याने पीडित मुलीचा फायदा घेत तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर गेल्या ५ महिन्यांपासून आरोपी पीडितेवर वारंवार अत्याचार करत होता. ही बाब पीडित मुलीच्या आई-वडिलांना मिळाली त्यानंतर तत्काळ मुलीच्या पालकांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दीपक हिवाळे विरोधात गुन्हा दाखल केला. घटनेचे गांभीर्य ओळखून विठ्ठलवाडी पोलिसांनीही लागलीच आरोपीला अटक केली. तसेच या प्रकरणी अधिक तपास सुरु असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी दिली.

Edited By - Shivani Tichkule

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com