Auto Rickshaw Strike Pune : 'प्रशासनाने आम्हाला फसवलं'; पुण्यात रिक्षा चालक उद्यापासून पुन्हा संपावर जाणार

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालक बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात उद्यापासून पुन्हा एकदा संपावर जाणार आहे.
auto rickshaw file photo
auto rickshaw file photo saam tv
Published On

प्राची कुलकर्णी

Auto Rickshaw Strike Pune : पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील रिक्षा चालक बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात उद्यापासून पुन्हा एकदा संपावर जाणार आहे. 'गेल्या वर्षभरापासून आम्ही बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात आंदोलन, निवेदने सरकार आणि प्रशासनासमोर करत आहोत. परंतु आज तागायत आमच्या तोंडाला पाणी पुसण्याशिवाय भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काहीही केले नाही, असा आरोप करत बघतोय रिक्षावाला संघटनेनचे डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी पुन्हा एकदा संपाची घोषणा केली आहे. (Latest Marathi News)

auto rickshaw file photo
Pune News : ट्रेक करताना रोप तुटला आणि घात झाला; २५ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात 'बघतोय रिक्षावाला संघटने'ने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. २८ नोव्हेंबर रोजी 'बघतोय रिक्षावाला संघटने'ने बेकायदा बाईक टॅक्सी विरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात बेमुदत संप पुकारला होता. परंतु प्रशासनातील अधिकारी आणि मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या आश्वासनानंतर स्थगित करण्यात आला.

त्यानंतर आता ' मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आदेश देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी बेकायदा बाईक टॅक्सीवर कारवाई करण्यास तयार नाही, असा आरोप करत 'बघतोय रिक्षावाला संघटना' पुन्हा उद्यापासून संपावर जाणार आहे. डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी परिपत्रक काढत संपाविषयी माहिती दिली आहे.

डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी पुढे सांगितले, 'पुणेकरांची गैरसोय होऊ नये म्हणून २८ नोव्हेंबर २०२२ रोजी, १४ दिवसांसाठी आम्ही आमचे आंदोलन स्थगित केले. पण गेल्या १४ दिवसांमध्ये सुद्धा कागदी घोडे नाचवण्याशिवाय या सरकारी अधिकाऱ्यांनी आमच्या विषयावर तोडगा काढला नाही'.

'आज रिक्षा चालकांच्या घरात अन्नाचा कण नाही. आमचे कुटुंब उपाशी आहेत. आम्ही सुद्धा याच देशाचे नागरिक आहोत. त्यामुळे आमच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणे हा आमचा कायदेशीर हक्क आहे. आणि तो आम्ही बजावणारच, असेही डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी सांगितले.

auto rickshaw file photo
Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील शाईफेक प्रकरणी 10 पोलीस निलंबित; पोलीस आयुक्त अंकुश शिंदेची कारवाई

'उद्यापासून पुन्हा पुणे व पिंपरी चिंचवड मधील 1.25 लाख रिक्षा बंद असतील. अनेक ठिकाणी चक्काजाम झालेले असेल, पण आमच्या उपासमारीस आणि जो त्रास आपल्याला होतोय त्यास सर्वस्वी भ्रष्ट अधिकारी जबाबदार आहेत, असा आरोप देखील डॉ. केशव नाना क्षीरसागर यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांवर केला आहे .

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com