Railway Updates: दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर; प्रवाशांसाठी सोडल्या ज्यादा बसेस

Dadar-Puducherry Express Updates: प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या असून ठाणे/मुलुंड या रस्त्याने प्रवास करावा अशी विनंती रेल्वे प्रशासनाने केली आहे.
Restoration work is going on war-footing of Dadar-Puducherry Express accident
Restoration work is going on war-footing of Dadar-Puducherry Express accidentSaam Tv
Published On

मुंबई: मध्य रेल्वेच्या दादर आणि माटुंगा रेल्वे स्थानकांदरम्यान शुक्रवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास मोठा रेल्वे अपघात होता. गदग एक्सप्रेस आणि पद्दुचेरी एक्सप्रेस (Puduchari Express) एकाच ट्रॅकवर समोरासमोर आल्याने दोन एक्सप्रेस गाड्या धडकल्या. (Accident) या धडकेनंतर दादर-पद्दुचेरी या एक्सप्रेसचे मागील बाजूचे तीन डबे रुळांवरून घसरले. अजूनही याठिकाणी दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरु असून हे काम आज (शनिवार) दुपारी १२ पर्यंत पुर्ण होईल असं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी ज्यादा बसेस सोडण्यात आल्या असून ठाणे/मुलुंड या रस्त्याने प्रवास करावा अशी विनंती रेल्वे (Central Railway) प्रशासनाने केली आहे. (Restoration work is going on war-footing of Dadar-Puducherry Express accident)

हे देखील पहा -

मध्य रेल्वेने आवाहन केलं की, अप फास्ट उपनगरीय प्रवाशांना विनंती आहे की त्यांनी ठाणे/मुलुंड येथून रस्ता वाहतुकीचा पर्याय निवडावा. तेथून त्यांच्या सोयीसाठी मुंबईच्या दिशेने जादा बसेस चालवल्या जातील. दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. झालेल्या गैरसोयीबद्दल दिलगीर आहे. तसेच रेल्वेचे अपघातग्रस्त डबे हटवण्याचे, ओएचई वायर आणि ट्रॅक दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. आज दुपारी 12 वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. या कालावधीत, जलद मार्गावरील वाहतूक भायखळा आणि माटुंगा स्थानकांवरील धिम्या मार्गावरून वळवली जाईल अशी माहिती रेल्वेने दिली आहे. (3 coaches of Dadar-Puducherry Express derail near Matunga; no injuries reported)

रद्द झालेल्या गाड्या आणि नवे वेळापत्रक -

दादरजवळ रुळावरुन घसरल्यामुळे खालील गाड्या रद्द,शॉर्ट टर्मिनेट झाल्या आहेत

Trains Update-6

Due to derailment near Dadar, the following trains are cancelled / short

terminated

Trains cancelled JCO 16.4.2022

a) 12110 Manmad-Mumbai Panchvati Express

b) 11010 Pune-Mumbai Sinhagad Express

c) 11009 Mumbai-Pune Sinhagad Express

d) 02102 Manmad-Mumbai Summer Special

e) 02101 Mumbai-Manmad Summer Special

f) 12124 Pune-Mumbai Deccan Queen g) 12123 Mumbai-Pune Deccan Queen

Short termination of trains

a) 10112 Madgaon-Mumbai Mandovi Express JCO 15.4.2022 short terminated at

Panvel and run as 10103 Mumbai-Madgaon Mandovi Express JCO 16.4.2022

b) 12112 Amravati-Mumbai Express JCO 15.4.2022 short terminated at Dadar

c) 12262 Howrah-Mumbai Duranto Express JCO 15.4.2022 short terminated at Thane

d) 12140 Nagpur-Mumbai Sewagram Express JCO 15.4.2022 short terminated at Nashik Road and will run as 12139

e) 17611 Nanded-Mumbai Rajyarani Express JCO 15.4.2022 short terminated at Manmad

Short origination of trains

a) 12071 Mumbai-Jalna Janshatabdi Express JCO 16.4.2022 cancelled between Mumbai and Manmad (will originate from Manmad)

b) 10103 Mumbai-Madgaon Mandovi Express JCO 16.4.2022 will run from Panvel.

Rescheduling of trains

a) 22105 Mumbai-Pune Indrayani Exp (dep 05.10 hrs) JCO 16.4.2022 at 09.30 hrs b) 22119 Mumbai-Karmali Tejas Exp (dep 05.50 hrs) JCO 16.4.2022 at 10.30 hrs

अपघात कसा झाला होता?

दादर (Dadar) रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ५ वरून एक्स्प्रेस सुटल्यानंतर माटुंगा रेल्वेस्थानकाजवळ दोन लांब पल्ल्याच्या गाड्या एकमेकांसमोर आल्या. गदग एक्स्प्रेस आणि पद्दुचेरी एक्स्प्रेस (Puduchari Express) या गाड्या एकाच ट्रॅकवर आल्या. त्यानंतर मागून आलेल्या एक्स्प्रेसचं इंजिन दादर -पद्दुचेरी एक्स्प्रेसला धडकलं. त्यानंतर एक्स्प्रेसचे मागील ३ डबे रुळावरून घसरले. दादरहून ही एक्स्प्रेस सुटल्यानंतर काही वेळातच माटुंगा (Matunga) स्थानकाजवळ हा रेल्वे अपघात (Railway Accident) झाला.

रेल्वेचे (Railway) डबे रुळावरून घसरले असले तरी, या अपघातात आतापर्यंत कोणालाही दुखापत झालेली नसल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान घटनास्थळी अभियांत्रिकी पथक दाखल झाले. या अपघातामुळं मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील आणि एक्स्प्रेस गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत स्थगित करण्यात आल्या. या अपघातात कुणालाही दुखापत झाली नाही. मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्यानं CSMT स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. (Railway Accident : Puduchari Express crashes at Matunga railway station)

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com