मुंबई : शैक्षणिक शुल्क माफीसह विविध मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन देऊन देखील अनेक महिने उलटले आहे. तरी वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाने आजून देखील कार्यवाही न केल्यामुळे संतप्त झालेल्या निवासी डॉक्टरांच्या मार्ड संघटनेने शेवटी आजपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे.
या संपामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांतील सर्व निवासी डॉक्टर संपावर जाणार असल्याने रुग्णव्यवस्था कोलमडण्याची शक्यता आहे. निवासी डॉक्टर गेले जवळपास दीड वर्षको कोरोना सेवेमध्ये असल्याने शैक्षणिक अभ्यासक्रम शिकविलेला नाही. तेव्हा शैक्षणिक शुल्क माफ करण्याची मागणी मार्डतर्फे मागील अनेक महिन्यांपासून केली जात आहे.
हे देखील पहा-
वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांसोबत २ महिन्यापूर्वी झालेल्या बैठकीत मंत्री अमित देशमुख यांनीही या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु, त्यानंतर देखील यावर ठोस कार्यवाही विभागाने केली नाही. यामुळे अखेर मार्डने शुक्रवारपासून राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संपावर जाण्याचा निर्णय गुरुवारी जाहीर केला आहे.
शुक्रवारी सकाळी ८ वाजल्यापासून डॉक्टर संपावर जाणार आहेत. आपत्कालीन आणि अतिदक्षता विभागातील सेवा सुरू असतील असे मार्डने यांनी स्पष्ट केले आहे. संपाबाबत मार्डची वैद्यकीय संशोधन आणि संचालनालयाच्या संचालकांसोबत सेंट जॉर्ज रुग्णालयात गुरुवारी रात्री उशीरापर्यत बैठक सुरू होती. या बैठकीनंतर पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचे मार्डने यांनी सांगितले आहे.
सद्य:स्थितीमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी असली तरी राज्यात सध्या ३६ हजार ६७५ रुग्ण उपचाराधीन आहेत, तर सुमारे १७ हजार रुग्ण रुग्णालयात दाखल आहेत. तसेच कोरोना संक्रमण कमी झाल्याने आता बहुतांश रुग्णालयांमध्ये इतर आजारांच्या सेवा, रखडलेल्या शस्त्रक्रियाही सुरू झालेल्या आहेत.
परिणामी रुग्णालयावर असलेले ताण परत वाढू लागला आहे. शासकीय महाविद्यालयांचा डोलारा हा निवासी डॉक्टरांवर अवलंबून असतो. अशा परिस्थितीमध्ये निवासी डॉक्टर संपावर गेल्यास रुग्णसेवेवर नक्कीच परिणाम होण्याची शक्यता आहे.
Edited By- Digambar Jadhav
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.