Mumbai Latest News: जुहूतील सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला, संरक्षण खात्याच्या निर्णयाविरोधात सेलिब्रिटींचं मौन; नागरिक उतरले रस्त्यावर

Latest News on Mumbai Juhu : जुहूतील सोसायट्यांचा पुनर्विकास रखडला, संरक्षण खात्याच्या निर्णयाविरोधात सेलिब्रिटींचं मौन
Mumbai Juhu
Mumbai JuhuSaam Tv

>> संजय गडदे

Latest News on Mumbai Juhu : मुंबईच्या जुहू परिसरातील 180 पेक्षा अधिक सोसायट्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. या सोबतच दोन एसआरए प्रकल्प देखील पुनर्विकास होण्यापासून रखडले आहेत. संरक्षण खात्याच्या निर्णयामुळे हा पुनर्विकास रखडला असल्याचा आरोप करत आज मुंबईच्या जुहू परिसरातील शेकडो नागरिक रस्त्यावर उतरले.

जुहूतील सेलिब्रिटींना देखील या निर्णयाचा फटका बसला असूनही सेलिब्रिटींनी मौन साधली असल्याने रहिवाशांनी मात्र या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. संरक्षण खात्याच्या हरकतीमुळे पुनर्विकास रखडल्याचा आरोप करत आज जुहू वायरलेस अफेक्टेड रेसिडेंट असोसिएशनच्या वतीने आज जुहू ऋतुभरा कॉलेज ते संपूर्ण जुहू परिसरातून मोरागाव असा मोर्चा काढण्यात आला.  (Latest Marathi News)

Mumbai Juhu
EPFO: घरात लग्नकार्य आहे? मग PF खात्यातून काढू शकता इतके पैसे, जाणून घ्या संपूर्ण माहिती

लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा स्थानिकांचा इशारा

लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रश्न निकाली न निघाल्यास येणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा देखील मोर्चेकर्‍यांनी यावेळी दिला.

मुंबईतील जुहू परिसर हा उच्चभ्रूंची वस्ती असलेला परिसर आहे. या परिसरात अनेक सेलिब्रिटी देखील राहतात. जुहू मोरगाव परिसरात डिफेन्स अधिकारी देखील राहत असल्याने इथे संरक्षण खात्याने बफर झोन घोषित केला आहे. बफर झोनच्या 500 मीटर परिसरात कोणत्याही प्रकारचे बांधकाम करताना संरक्षण खात्याची परवानगी घ्यावी लागते.

Mumbai Juhu
Pm Narendra Modi Latest Photo: 'टायगर प्रिंट' शर्ट परिधान करून पंतप्रधान मोदींची जंगल सफारी, पाहा फोटो

मात्र 2008 सालापासून संरक्षण खात्याने या परिसरात बांधकाम करण्यास मनाई केली आहे. याचा फटका जुहू परिसरातील 180 पेक्षा अधिक इमारतींच्या पुनर्विकास झाला आहे. याशिवाय या परिसरातील दोन एसआरए प्रकल्प देखील पुनर्विकासापासून वंचित आहेत. संरक्षण खात्याने या नियमात सूट देऊन येथील धोकादायक इमारतींचे पुनर्विकासाचा प्रश्न सोडवण्यास मदत करावी या मागणीसाठी आज जुहू भागात वायरलेस इफेक्टेड रेसिडेंट असोसिएशनच्या वतीने भव्य अशा मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com