पुणे महापालिकेत अनेक पदांसाठी भरती; आजपासूनच करा अर्ज

या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ४४८ रिक्त पदं काढण्यात आली आहेत.
PMC
PMCSaam Tv
Published On

पुणे - सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी. पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. या भरती प्रक्रियेअंतर्गत एकूण ४४८ रिक्त पदं काढण्यात आली आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच, २० जुलै २०२२ पासून सुरू झाली असून अर्ज करण्याची अंतिम तारीख १० ऑगस्ट २०२२ आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अधिकृत वेबसाइट pmc.gov.in वर जाऊन या पदांसाठी अर्ज करू शकतात.

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख : 20 जुलै 2022

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 ऑगस्ट 2022

रिक्त जागांचा तपशील

असिस्टंट लीगल ऑफिसर : 04

क्लर्क टायपिस्ट : 200

ज्युनिअर इंजीनियर (सिव्हिल) : 135 पदं

ज्युनिअर इंजीनियर (मॅकेनिकल) : 05 पदं

ज्युनिअर इंजीनियर (ट्रॅफिक प्लानिंग) : 04 पदं

असिस्टंट एनकॉर्चमेंट इंस्पेक्ट : 100

हे देखील पाहा -

भरतीसाठीची वयोमर्यादा

पुणे महानगरपालिकेनं जारी केलेल्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांचं कमीत कमी वय 18 वर्ष आणि जास्तीत जास्त वय 38 वर्ष असावं.

अर्ज शुल्क

या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 1000 रुपये शुल्क भरावं लागेल. दुसरीकडे, आरक्षित प्रवर्गासाठी 800 रुपये शुल्क भरावं लागणार आहे.

PMC
रस्त्याअभावी गर्भवतीचा तीन तास झोळीतून प्रवास; नंदुरबार जिल्ह्यातील घटना

निवड प्रक्रिया

या पदांवरील निवड लेखी चाचणी, मुलाखत, टायपिंग चाचणी, कागदपत्र पडताळणी इत्यादीद्वारे केली जाईल. या पोस्ट्सबद्दल अधिक तपशीलवार माहितीसाठी, अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com