लिपस्टिकची विक्री पाहून येतो आर्थिक मंदीचा अंदाज; अर्थव्यवस्थेशी कसा आहे संबंध?

2001 साली अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावली असताना बाजारात लिपस्टिकची विक्री जोरात सुरू होती.
Old Lipstick
Old LipstickCanva

मुंबई : बाजारातील लिपस्टिकची मागणी वाढली की मंदीचा अंदाज वर्तवला जातो. तर्क थोडा हास्यास्पद वाटेल पण हा सिद्धांत आणि त्याचा लिपस्टिकच्या मंदीशी असलेला संबंध अगदी सरळ आहे. 2001 मध्ये लिओनार्ड लॉडर यांनी हा सिद्धांत मांडला. जर बाजारात लिपस्टिकची विक्री अधिक वाढली तर आपण मंदीच्या तोंडावर पोहोचलो आहोत. याला लिपस्टिक इंडेक्स म्हणतात.

2001 साली अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदावली असताना बाजारात लिपस्टिकची विक्री जोरात सुरू होती. लॉडर म्हणाले की, लिपस्टिक विक्री आणि अर्थव्यवस्थेचा वेग यांच्यात विपरित संबंध आहे. बाजारात स्वस्तातील सौंदर्य प्रसाधनांची विक्री वाढली, तर मंदीने हळूहळू अर्थव्यवस्थेला जोर धरला आहे, असे मानले जाते. म्हणजेच जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते तेव्हा लिपस्टिकची विक्री वाढते.  (Latest Marathi News)

Old Lipstick
'जगभर मंदीचे वातावरण असताना...';राज्याच्या कर संकलनावर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केलं मोठं विधान

या सिद्धांतामागील अर्थशास्त्रज्ञांचे तर्क असे आहे की जेव्हा अर्थव्यवस्थेत मंदी असते तेव्हा महिला अधिक महाग कॉस्मेटिक आणि सौंदर्य उत्पादने खरेदी करू शकत नाहीत आणि त्यांचा भर बचतीवर असतो. अशा परिस्थितीत स्वस्त सौंदर्यप्रसाधने आणि कमी किमतीतील सौंदर्य प्रसाधने यातूनच ती स्वतःला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतात. साहजिकच, स्वस्त सौंदर्य उत्पादनांमध्ये लिपस्टिक सर्वात सोपी आहे आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये देखील ती सर्वात प्रमुख मानली जाते.

Old Lipstick
Areez Pirojshaw Khambatta Dies : रसना कंपनीचे अध्यक्ष खंबाट्टा यांचे निधन; वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

केवळ लिपस्टिकच्या विक्रीतच नव्हे तर इतर उत्पादनांच्या विक्रीतही मंदीचे संकेत अर्थतज्ज्ञांनी दिले आहेत. 1970 च्या दशकात अॅलन ग्रीनस्पॅनने बाजारात मंदीचे संकेत दिले होते जेव्हा अंडरवियरची विक्री कमी झाली होती. ते म्हणाले होते की जेव्हा अंडरवियरची विक्री बाजारात कमी होऊ लागते तेव्हा हे सूचित करते की अर्थव्यवस्था रुळावर नाही. अंडरवेअरसारख्या गोष्टींवर ग्राहक खर्च करणे टाळत असल्याची माहिती आहे. यावेळी, फक्त त्या गोष्टींवर खर्च करावयाचा आहे, ज्या खूप महत्वाच्या असतील.

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com