Areez Pirojshaw Khambatta Dies : रसना कंपनीचे अध्यक्ष खंबाट्टा यांचे निधन; वयाच्या ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राण ज्योत मावळली.
Areez Pirojshaw Khambatta Dies
Areez Pirojshaw Khambatta DiesSaam TV

Areez Pirojshaw Khambatta Dies: लहानपणी उन्हाळ्यात रसना सरबत तुम्ही हमखास पिले असेल. अशात याच नावाजलेल्या कंपनीच्या अध्यक्षासंबंधी एक वाईट बातमी समोर आली आहे. आरीस पिरोजशा खंबाट्टा यांचे निधन झाले आहे. रसना ग्रुपने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून याची माहिती दिली. वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. शनिवारी १९ नोव्हेंबर रोजी त्यांची प्राण ज्योत मावळली.

पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार आरीस पिरोजशा खंबाट्टा हे रसना कंपनी (Company) बरोबरच अरिज खंबाट्टा बेनेव्होलेंट ट्रस्टचेही अध्यक्ष होते. तसेच वर्ल्ड अलायन्स ऑफ पारसी इराणी जरथोस्तीसाठी त्यांनी अध्यक्षपदी कारभार पाहिला होता. एवढेच नाही तर, ते अहमदाबाद पारसी पंचायतीमध्ये माजी अध्यक्ष होते. त्यांच्या कारकीर्दीविषयी सांगताना पीटीआयने म्हटले की, "खंबाटा यांनी त्यांच्या कारकिर्दीत भारतातील उद्योग, व्यापार आणि समाजसेवेसाठी मोठे योगदान दिले आहे. "

Areez Pirojshaw Khambatta Dies
Maharashtra-Karnataka Border Dispute: महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन मंत्र्यांची नियुक्ती

देशात १८ लाख दुकानांवर विकले जाते रसना

रसना देशात सर्वाधीक पसंतीचे पेय आहे. देशात जवळपास १८ लाख दुकानांवर याची विक्री होते. इतर सॉफ्ट ड्रिंकच्या तुनेत रसना जास्त घट्ट आणि थंड सरबत देते. त्यामुळे आजही त्याची लोकप्रियता कमी झालेली नाही.

Areez Pirojshaw Khambatta Dies
 लिंबुंचं सरबत करून पाजलं असतं: ओवेसी

फक्त १ रुपयांच्या किंमतीवर विकला रसना

आरीस पिरोजशा खंबाट्टा यांनी रसनाच्या विक्रीसाठी अनोखी शक्कल लढवली. त्यांनी रसना प्रत्येक वर्गातील व्यक्तीला परवडणारा असावा यासाठी छोट्या पॅकेटमध्ये अवघ्या १ रुपयांत त्यांची विक्री केली. यामुळे गरीब, मध्यम वर्गीय अशा सर्वांनाच रसनाची गोडी लागली.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com