Rani Baug Tigres's Calf : राणीच्या बागेत 'जय' आणि 'रुद्र' चा रुबाब; वाघिणीच्या बछड्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

Mumbai Zoo Tigres's Calf : राणीच्या बागेत 'जय' आणि 'रुद्र' चा रुबाब; वाघिणीच्या बछड्यांना पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Mumbai Zoo Tigres's Calf
Mumbai Zoo Tigres's Calf Saam TV
Published On

Rani Baug Tigres's Calf : मुंबईमधील राणीच्या बागेत पुन्हा एकदा पर्यटकांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. त्यामागचं कारण ही तसेच आहे. वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील वाघांचे आणि पेंग्विनचे कुटुंब विस्तारले आहे.

रॉयल बेंगॉल टायगरच्या जोडीने म्हणजेच 'शक्ती आणि करिश्मा'ने ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन बछड्यांना जन्म दिला होता. तर पेंग्विन कक्षातही पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक याप्रमाणे तीन गोंडस पेंग्विन पिले जन्माला घातली. या नव्या पाहुण्यांमुळे वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय अधिक समृद्ध झाले आहे. गुरुवारपासून पर्यटक या नवीन पाहुण्यांना पाहण्याचा आनंद घेऊ शकतात.

Mumbai Zoo Tigres's Calf
Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टाने निर्णय अध्यक्षांकडे सोपवला तर काय होईल? नरहरी झिरवळ यांनी स्पष्टच सांगितले...

सध्या उन्हाळी सुट्या असल्याने दररोज हजारोंच्या संख्येने पर्यटक महानगरपालिकेच्या वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात भेट देत आहेत. त्यातील अनेकांना वाघ शक्ती आणि वाघीण करिश्मा यांना पाहण्याची खूप उत्सुकता असते. तसेच मागील काही वर्षांपासून प्राणिसंग्रहालयात आलेले पेंग्विन पाहण्यासाठीदेखील पर्यटक येतात. मात्र आता या दोन्ही ठिकाणी आलेल्या पाहुण्यांमुळे पर्यटकांची ही सफर यादगार ठरणार आहे. (Latest Political News)

Rani Baug Tigres's Calf : जय आणि रुद्र उमटवत आहेत ठसे

छत्रपती संभाजीनगर येथील सिद्धार्थ प्राणिसंग्रहालयातून १२ फेब्रुवारी २०२० रोजी शक्ती वाघ (वय ७ वर्षे) आणि करिश्मा वाघीण (९ वर्षे) या जोडीला वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात आणले आहे. करिश्मा वाघीणने गत वर्षी दिनांक ४ नोव्हेंबर २०२२ रोजी दोन रुबाबदार नर बछड्यांना जन्म दिला आहे. तेव्हापासून करिश्मा आपल्या दोन्ही बछड्यांना एकेक धडे गिरवत पालन करीत आहे.

Mumbai Zoo Tigres's Calf
Eknath Shinde on Maharashtra political crisis : सत्तासंघर्षाचा उद्या निकाल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले...

आता या दोन्ही बछड्यांचे वय ६ महिने आणि ७ दिवस आहे. दोन्ही बछडे त्यांच्या आवारात सैर करीत असतात. पुढील दीड ते दोन वर्षे या बछड्यांना करिश्मासोबतच ठेवण्यात येणार आहे. प्राणिसंग्रहालयातील वैद्यकीय पथकाने जय आणि रुद्रची काळजी घेत त्यांचे वेळोवेळी लसीकरण आणि इतर महत्त्वाच्या तपासणी केल्या आहेत. सध्या हे दोघे लहान असल्याने त्यांच्यासाठी खाद्यगृहाचे दरवाजे खुले ठेवलेले असतात. तसेच जो मांसाहार करिश्माला पुरविला जात आहे.

तोच जय आणि रुद्रला दिला जात आहे. हे बछडे आणि करिश्मा तळ्यात आणि हिरवळीवर सैर करतात. आता पर्यटकांना एक दिवसाआड जय आणि रुद्रसह करिश्माला तर दुसऱ्या दिवशी शक्तीला पाहण्याचा आनंद घेता येणार आहे, असे उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, प्राणिसंग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी, उप अधीक्षक तथा पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. कोमल राऊळ यांनी कळविले आहे.

Mumbai Zoo Penguins : पेंग्विन कक्षातही वाढली किलबिल

प्राणिसंग्रहालयातील पेंग्विन कक्षातील पेंग्विनच्या तीन जोडप्यांनी प्रत्येकी एक अशा तीन पिलांना जन्म दिला आहे. त्यामुळे पेंग्विनची संख्या वाढून आता एकूण १५ झाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com