विधान परिषद निवडणूक महाविकास आघाडी एकत्र लढणार का?, संजय राऊत म्हणाले...

शिवसेना नेते संजय राऊत यांनी पराभवावरुन अपक्ष आमदारांवर आरोप केले होते.
Sanjay Raut
Sanjay RautSaam TV

मुंबई: राज्यसभा निवडणुकीत (Election) महाविकास आघाडीचा सहावा उमेदवार पराभूत झाल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. काल शिवसेना नेते संजय राऊत यांनी पराभवावरुन अपक्ष आमदारांवर आरोप केले होते. यावरुन अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी आम्ही महाविकास आघाडीलाच मतदान केले असल्याचे म्हणत संजय राऊत यांच्या आरोपांचे खंडण केले आहे. देवंद्र भुयार आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेणार आहेत, यावर संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रीया दिली. (Sanjay Raut On Legislative Council elections)

Sanjay Raut
धनंजय महाडिकांनी राजू शेट्टींचे रस्त्यावरच घेतले आशीर्वाद; साधेपणाचा व्हिडीओ व्हायरल

संजय राऊत म्हणाले, आमदार देवेंद्र भुयार चांगले कार्यकर्ते आहेत, ते शरद पवार यांना भेटणार आहेत. भेटायला काही हरकत नाही. दरम्यान, काल संजय राऊत या निकालावरुन नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या, यावर बोलताना राऊत म्हणाले, मी नाराज नाही लोकशाहीत असे निकाल लागत असतात. आम्ही आता पुढच काम करत आहोत.

राज्यसभा निवडणुकीत आमच्या एक उमेदवाराचा पराभव झाला, या निवडणुकीत फोडापोडी झालेली नाही. आम्हाला काही अपेक्षित मत मिळालेली नाहीत, असंही संजय राऊत ((Sanjay Raut) म्हणाले.

Sanjay Raut
Satara : जास्त काळजीचा विषय आहे असे वाटत नाही : जयंत पाटील

विधान परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्र लढणार

२० जून रोजी राज्यात विधान परिषदेसाठी निवडणुका होणार आहेत. राज्यात विधान परिषदेच्या जागा महाविकास आघाडी एकत्रित लढणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. 'आपापलं पाहा असं काही ठरलेलं नाही. विधान परिषदेत महाविकास आघाडी एकत्र लढेल' असंही संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले. (Sanjay Raut Latest News)

Sanjay Raut
'राज्यसभेत झालं तेच विधानपरिषदेत होईल, संजय राऊतांनी अपक्ष आमदाराचा अपमान केला आहे'

'संजय राऊतांनी अपक्ष आमदाराचा अपमान केला आहे'

राज्यसभेच्या निकालामुळे महाराष्ट्रातील जनता खुश आहे. कारण, महाराष्ट्रातील या सरकारला जनता वैतागली आहे. फक्त जनताच नाही तर सर्व पक्षांसह अपक्ष आमदार हे सुद्धा वैतागलेले आहेत. ज्यांचे मंत्री कमिशन घेतात, मुख्यमंत्री जनतेला भेटत नाहीत. तर जनतेचे काम कसे करणार. त्यामुळे शेतकरी शेतमजूर सगळे वैतागलेत. या सरकारमुळे महाराष्ट्राचे वाटोळे होत असल्याचं वक्तव्य भाजपनेते अनिल बोंडे (Anil Bonde) यांनी केलं आहे.

लोकांना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या मुख्यमंत्री काळाची आठवण होत आहे, पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पाहिजे असे त्यांना वाटत असल्याचंही बोंडे म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेना खासदार संजय राऊतांवर (Sanjay Raut) देखील निशाणा साधला ते म्हणाले, 'आता शिवसैनिक म्हणायला लागले आहे की संजय राऊत यांनी बोलणं थांबवलं पाहिजे, सत्ता ही लोकांसाठी लोकांच्या भल्यासाठी असते. दुर्दैवाने त्यांना सत्तेचा माज आला आहे.'

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com