Raju Shetti: शरद पवार भिजले, त्याप्रमाणे त्यांची आश्वासनंही विरघळली, त्याचा जाब स्वाभिमानी विचारणार - राजू शेट्टी

शरद पवारांच्या भिजण्याप्रमाणे त्यांनी दिलेली आश्वासने ही विरघळली आहे, त्याचा जाब स्वाभिमानी शेतकरी संघटना विचारणार आहे, असंही ते म्हणाले
Raju Shetti
Raju ShettiSaam Tv
Published On

पुणे: राज्यात आज नगरपंचायत निवडणुकांचे निकाल लागले आहेत. त्यामध्ये कुठे भाजपने बाजी मारलीये. तर काही ठिकाणी शिवसेना, काँग्रसे, राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. त्यावर महाविकास आघाडीने हुरळून जायची गरज नाही, ज्याचं सरकार असते त्यांचे काही लोक निवडूण येतातच, अशी टीका स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी यांनी केलीये. तसेच, शरद पवारांच्या भिजण्याप्रमाणे त्यांनी दिलेली आश्वासने ही विरघळली आहे, त्याचा जाब स्वाभिमानी शेतकरी संघटना विचारणार आहे, असंही ते म्हणाले (Raju Shetti Criticize Sharad Pawar And Mahavikas Aghadi).

Raju Shetti
Nagar Panchayat Elections 2022 Result: नारायण राणेंच्या बालेकिल्यात सेनेस ७ जागा

स्थानिक स्वराज्य संस्थेत साधारण राज्यात ज्यांचं सरकार असतं, त्यांचे लोक विजयी होतात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी हुरळून जायचे कारण नाही, असं म्हणत स्वाभीमानीचे नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीवर टीका केली आहे. तिजोरीच्या चाव्या त्यांच्याकडे आहे म्हणून हे लोक त्यांच्याकडे गेलेत.

यावरुन राज्याचं सर्वमत सांगता येणार नाही, महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) ने त्यांचा कारभार सुधारला नाही तर त्यांना धोक्याची घंटा निश्चित आहे, असा इशाराही त्यांनी दिला.

Raju Shetti
Elections : "जेवढ्या निवडणुका होतायत, तिथे राष्ट्रवादीची भरभराट आणि शिवसेनेची फरफट होतेय"

शरद पवारांवर राजू शेट्टीची घणाघाती टीका

शरद पवार पावसात भिजले त्यांच्या भिजण्याने लोकांची मनं विरघळली आणि त्यांनी राष्ट्रवादीला सत्ता दिली. मात्र, त्यांच्या भिजण्याप्रमाणे त्यांनी दिलेली आश्वासने ही विरघळली आहे, त्याचा जाब स्वाभिमानी शेतकरी संघटना विचारणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शिवसेनेला घेऊन सरकार स्थानप झालं. मात्र शेतकऱ्यांची कामं झाली नाही. भूमी अधीग्रहण कायद्याला विरोध करणारे शरद पवार आज कुठे आहेत? राज्य सरकारने दोन कायदे केलेत त्याला आमचा विरोध आहे. शरद पवारांना भेटून मी जाब विचारणार राजू शेट्टीचा इशारा दिलाय.

राजू शेट्टींकडून रोहीत पाटलांचं कौतुक

रोहीतचे अभिनंदन, सगळे विरोधात असताना रोहित लढला. इतर भागातील तरुणांनी पण रोहित चा आदर्श घ्यावा. प्रस्थापितांना आपण धक्का देऊ शकतो, ती ताकद ,क्षमता आपल्यात आहे हे लक्षात घ्यावं, असं म्हणत त्यांनी रोहीत पाटलांचे कौतुक केले आहेत.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com