मुंबई: राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना उपाययोजना करण्यासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे - पाटीलही उपस्थित होते. या भेटीत शरद पवार (Sharad Pawar) यांनी राजेश टोपे (Rajesh Tope) यांच्याकडून राज्यातील कोरोना (Corona) परिस्थितीचा आढावा घेतला आणि इतर सर्व गोष्टी जाणून घेतली अशी माहिती राजेश टोपेंनी दिली आहे. (Rajesh Tope meets sharad Pawar; There was an important discussion about the growing number of corona patients)
हे देखील पहा -
पवारांच्या भेटीबीबत राजेश टोपे म्हणाले की, शरद पवार यांच्याशी रोज संपर्क असतो. त्यांना कोरोना संदर्भात अधिक माहित जाणून घ्यायच्या होत्या. त्यानुसार सध्याची परिस्थिती कडक नियमयाची अंमलबजावनी होते का नाही हे सांगितलं. जर निर्बंध वाढवण्याची आवश्यकता असेल तर ती करावी अशी सूचना केली आहे.
पुढे राजेश टोपे म्हणाले की, मुंबई आणि पुण्यात शाळा बंद केल्या आहेत. काही जण विनाकारण रस्त्यावर फिरत असतात. मग शाळा बंद करून अर्थ काय असे आरोग्य विभागाकडून सांगतले. याच अनुशंगाने पवार यांनी माहिती घेतली. मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री हे लवकरच योग्य तो निर्णय घेतील असंही ते म्हणाले.
पुढे टोपे म्हणाले की, लसीकरण वाढवले पाहिजे यावर एकमत झाले. ७० ते ८० लाख लोकांनी अजूनही पहिली लस घेतलेली नाही. १० तारखेनंतर प्रिकॉशन लसीकरण झाले पाहिजे त्याचे नियोजन कसे असणार याची माहिती पवारांनी घेतली. औषध, निर्बंध यावर चर्चा झाली. कौटुंबिक कार्यक्रमांवर कडक नियमांची अंमलबजावणी व्हायला हवी. कोरोनाची वाढती आकडेवारी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. पवारांनी आधी समजून घेतलं, आरोग्य विभागाकडून काही सूचना मागवून घेतल्या आहेत. काय कराव काय, करू नये हे जाणून घेतलं. आज संध्याकाळपर्यंत ती माहिती शरद पवार यांना देऊ. विकेड लॉकडाऊनबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असंही ते म्हणाले आहेत.
राजेश टोपेंनी सांगितलेले महत्वाचे मुद्दे:
- मुंबईची लोकल बंद होणार नाही.
- जिल्ह्या अंतर्गत बंदी नाही.
- 80 टक्के बेड रिकामे आहेत.
- बेड्सची उपलब्धता आहे, ऑक्सिजनही पुरेसा आहे.
- मुंबईत सर्वाधिक लसीकरण झालं आहे.
- मुंबईत आज फ्रंन्टलाइन वर्कर्स पॉझिटिव्ह येत आहेत, ही चिंतेची बाब आहे, मनुष्यबळ महत्वाचं आहे.
- राजकीय सभा, मिरवणुका काढू नये असं शरद पवार यांनी सांगितलं आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.