mumbai corona cases
mumbai corona cases Saam TV

Mumbai Corona: मुंबईत दररोज कोरोना रुग्णांमध्ये 20-30 टक्क्यांची वाढ, आरोग्य विभाग सज्ज

मुंबईत कोरोना (Corona) चाचण्यांच्या संख्येला वेग देण्यात येत असून रोज 60 हजार चाचण्या करण्यात येत आहेत. या संख्येत अधिक वाढ करण्यात येणार आहे.
Published on

मुंबई : मुंबईत दररोज 20 ते 30 टक्के कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेचा आरोग्य विभाग सज्ज झाला आहे. जर दिवसाला 25 हजार रुग्ण आले, तर पालिकेचा action प्लॅन तयार आहे (Mumbai Corona Cases Increases By 20 to 30 prercent daily).

आरोग्य विभागाने (Health Department) बेड, आरोग्य कर्मचारी-डॉक्टर्स, औषधे अशी सर्व प्रकारची तयारी केली आहे. तसेच, सध्या दररोज आढळणार्‍या रुग्णांमध्ये 89 टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसून फक्त 5 टक्के बाधितांनाच रुग्णालयात दाखल करावे लागत आहे.

मात्र, संभाव्य वाढीमुळे 10 टक्के रुग्णांना दाखल करावे लागले तरी 35 हजार बेडची सुविधा तैनात करण्यात आली आहे. सद्यस्थितीत आढळणार्‍या रुग्णांपैकी 5 टक्के बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागत असले तरी 25 हजार रुग्ण दिवसाला आढळले तर ही टक्केवारी दुप्पट होईल. त्यादृष्टीने 10 टक्के रुग्ण दाखल होतील.

विशेष म्हणजे अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाणही कमी असून केवळ 1 ते 2 टक्के रुग्णांनाच ऑक्सिजनची (Oxygen) गरज भासत आहे. मुंबईच्या अंदाजित दिवसाच्या गरजेच्या तीन पट ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. रुग्ण संख्येत वाढ होऊन ऑक्सिजनची गरज लागली तरी मुंबई महापालिकेकडे पुरेसा साठा उपलब्ध आहे.

mumbai corona cases
Sindhutai Sapkal: "तुझ्या प्रेमाला बंधन नाही, माई" Google ने सिंधूताईंना वाहिली श्रद्धांजली...

खाजगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांचीही सेवा घेणार आहे. रुग्ण संख्येत वाढ झाली आणि रुग्णांवर वेळीच उपचार करणे शक्य व्हावे, यासाठी डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय इत्यादी स्टाफ खाजगी कंत्राटी पद्धतीने भरती करण्यात येणार आहेत.

मुंबईत कोरोना (Corona) चाचण्यांच्या संख्येला वेग देण्यात येत असून रोज 60 हजार चाचण्या करण्यात येत आहेत. या संख्येत अधिक वाढ करण्यात येणार आहे. मुंबईत आढळणाऱ्या रुग्णांपैकी (mumbai covid19 update) पाच टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागते. त्यामुळे 82 टक्के बेड्स रिक्त असून रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्यांची संख्या वाढली, तर गरज पडल्यास खाटांची संख्या वाढवण्यात येणार असून 1 लाख बेड्स active होतील.

Edited By - Nupur Uppal

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News Saam TV
saamtv.esakal.com