Mumbai Local News: रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वेची अनोखी शक्कल, हटके कल्पनेचं तुम्हीही कौतुक कराल

Mumbai Local News: रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वेने अनोखी शक्कल लढवली आहे.
Mumbai Local News
Mumbai Local NewsSaam tv
Published On

Mumabi News:

मुंबईतील चाकरमान्यांची लाईफलाइन म्हटलं तर सर्वात आधी लोकल ट्रेनचं नाव घेतलं जातं. सकाळी कामाला जाताना प्रवाशांची पहिली पसंती लोकल ट्रेनला असते. मुंबईतील कानाकोपऱ्यात काम करणारे चाकरमानी लोकलने प्रवास करताना बहुतेकवेळा स्टेशनवर रुळ ओलांडताना दिसतात. यामुळे गेल्या काही वर्षांत अनेक अपघातांच्याही घटना घडल्या आहेत. याच रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी रेल्वेने अनोखी शक्कल लढवली आहे. (Latest Marathi News)

रेल्वेने रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांना रोखण्यासाठी प्लॅटफॉर्मवरील काही जागा काळ्या रंगाच्या ग्रीजने माखवण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुळ ओलांडणाऱ्या प्रवाशांचे हात आणि पाय ग्रीजने माखण्याची शक्यता आहे.

तसेच या ग्रीजमुळे प्रवाशांचे कपडे खराब होण्याची शक्यता आहे. रेल्वेने ही अनोखी शक्कल लढविल्यानंतर प्रवासी आता सुरक्षित मार्गावरून जाताना दिसत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Mumbai Local News
MP Mohammad Faisal : लोकसभेत वाढली शरद पवार गटाची ताकद; मोहम्मद फैजल यांना खासदारकी पुन्हा बहाल

रेल्वेतर्फे प्रवाशांना नेहमी रुळ ओलांडू नये, याबाबत सूचना दिल्या जातात. मात्र, तरीही काही प्रवाशांकडून धोकादायकरित्या रुळ ओलांडला जातो. प्रवाशांनी रुळ ओलांडू नये, यासाठी रेल्वेने पादचारी पूल लिफ्ट, सरकते जीने तयार केले आहेत. मात्र, तरीही काही प्रवासी धोकादायकरित्या रुळ ओलांडताना दिसतात.

mumbai news
mumbai newsSaam tv

पादचारी पुलावरून जाण्यास आळशीपणा करणारे प्रवासी रुळ ओलांडताना दिसतात. मात्र, अशा प्रकारे रुळ ओलांडणे अपघाताला कारण ठरतं. यामुळे काही जागा काळ्या रंगाच्या ग्रीजने माखवण्याचा निर्णय घेतला.

Mumbai Local News
Gold smuggling in Mumbai: डीआरआयची मोठी कारवाई; तब्बल ८.५ कोटी रुपयांचं १३.७ किलो सोनं केलं जप्त

रेल्वेचा उपाय

रेल्वेने 'शून्य मृत्यू' मोहीमेच्या अंतर्गत रेल्वे रुळांजवळ सुरक्षा भिंती, तारा बांधल्या आहेत. तरीही काही प्रवासी रुळ ओलांडून जातात. यामुळे आता रेल्वेने प्रवाशांनी रेल्वे रुळ ओलांडू नये, म्हणून बेलापूर आणि दादर रेल्वे स्थानकात ही अनोखी शक्कल लढवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com