मुंबई: राज्यातील कारागृहात कैद असलेल्या कैद्यांना मोबाईल आणि अमली पदार्थ पुरवणारं रॅकेट (Racket) समोर आलंय. फोनवर बोलण्यासाठी कैद्यांकडून 100 रुपये प्रति मिनीट वसूल केली जात असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत भाजपच्या प्रवक्त्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. जर "राज्याचे माजी गृहमंत्री आणि एक आजी कॅबिनेट मंत्री तुरुंगात (Jail) असतील तर या सुविधा जीवनावश्यक म्हणाव्या लागतील" असा खोचक टोला त्यांनी महाविकास आघाडी सरकारला लगावला आहे. (racket in the jail who provides mobile, drugs and other things in the jail to prisoners; chitra wagh slams to mva government)
हे देखील पाहा -
राज्यातील कारागृह भ्रष्टाचाराचे अड्डे बनले आहेत. कारागृहात कैद्यांना मोबाईल वापरण्यासाठी देणारे रॅकेट सक्रिय आहे. फोनवर बोलण्यासाठी कैद्यांकडून 100 रुपये प्रतिमिनीट वसूल केली जात असल्याची माहिती मिळत आहे. (Illegal Activities in Jail) त्याचप्रमाणे गांजाच्या पुडीसाठी 1 हजार रुपये तर जेवणाला तडका मारण्यासाठी 100 रुपये घेतले जात असल्याचीही माहिती मिळत आहे. त्यामुळे कैद्यांना सुखचैन वस्तू पुरविणारे रॅकेट सक्रिय असून आतापर्यंत राज्यातील कारागृहात कैद्यांना मोबाईल, गांजा, ड्रग्स पुरविण्यात आल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. ही बातमी बाहेर आल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांवर निशाणा साधल आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या की, "राज्याचे माजी गृहमंत्री आणि एक आजी कॅबिनेट मंत्री तुरुंगात असताना या सुविधा जीवनावश्यक म्हणाव्या लागतील.." असं ट्विट त्यांनी केलं आहे. सध्या राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) हे सध्या वेगवेगळ्या आरोपांखाली तुरुंगात आहेत. त्यामुळे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी वरील बातमीचा संदर्भ घेत नाव न घेता माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यावर खोचक टीका केली आहे.
Edited By - Akshay Baiane
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.