सांगली: आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असणारे शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य (Controversial Statement) केलं आहे. महात्मा गांधी म्हणजे हिंदुस्थानला झालेली बाधा आहे असं वादग्रस्त वक्तव्य संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी केलंय. सांगलीच्या मीरजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. भिडे म्हणाले की, हिंदुस्थानला तीन बाधा झाल्या आहेत. एक म्हणजे म्लेंच बाधा, दुसरी म्हणजे आंग्ल बाधा आणि तिसरी म्हणजे गांधीबाधा. या तीनही बाधांवर तोडगा म्हणजे शिवछत्रपती आणि संभाजी महाराज. त्यांची उपासना आपण केली पाहिजे असं संभाजी भिडे म्हणाले आहेत. (Sambhaji Bhinde Again Controversial Statement On Mahatma Gandhi In Miraj)
हे देखील पाहा -
संभाजी भिडेंच्या या वक्तव्याच्या समाचार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात गटाचे सचिन खरात (Sachin Kharat) यांनी घेतला आहे. सचिन खरात म्हणाले की, संभाजी भिडे म्हणतात या देशाला म्लेंच बाधा, दुसरी आंग्ल बाधा, तिसरी गांधी बाधा झाली आहे. यावर त्यांनी उपाय सांगितला आहे की, शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचे रक्त भारतातील जनतेत पाहिजे. परंतु संभाजी भिडे महाराष्ट्र राज्यातील जनतेचे रक्त हे रयतेचे राजे शिवाजी महाराज, संभाजी राजे, अहिल्याबाई होळकर, फुले, शाहू, आंबेडकर यांच्याच विचाराचे रक्त आहे. तुमचं रक्त मनुवादाचे आहे ते बदला आणि तुमच्या मनात हेगडेवार, गोळवलकर, उपाध्याय, मुखर्जी आहेत आणि तोंडात रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि संभाजी राजे आहेत. त्यामुळे तुमचे मनुवादी रक्त बदलून घ्या आणि रयतेचे राजे शिवाजी महाराज आणि संभाजी राजे यांचे करून घ्या. मग तुमची बाष्कळ बडबड आणि चिथावणीखोर भाषा थांबेल अशी खरमरीत टीका खरात यांनी भिडेंवर केली आहे.
Edited By - Akshay Baisane
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.