नगरसेवक करतात तरी काय? दिवा शहरात पाण्यासाठी काढलेल्या मोर्चात महिलांचा सवाल

ठाणे महापालिका आणि सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत...
दिवा शहरातील नगरसेवक करतात तरी काय?  पाण्यासाठी काढलेल्या मोर्चात महिलांचा सवाल
दिवा शहरातील नगरसेवक करतात तरी काय? पाण्यासाठी काढलेल्या मोर्चात महिलांचा सवालप्रदीप भणगे
Published On

दिवा : दिवा शहरातील Diva City काही भागात मागील काही महिन्यांपासून पाण्याची भीषण पाणी टंचाई Water scarcity निर्माण झाली आहे. नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. तर बऱ्याच वेळा पाणी विकत घ्यावे लागते. ठाणे महापालिका TMC आणि सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक ShivSena corporator या विषयाकडे दुर्लक्ष करत आहेत,असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत असल्याने आज भाजप दिवा-शीळ मंडळाच्या नेतृत्वाखाली दिवेकरांनी मोठ्या प्रमाणात हंडा-कळशी मोर्चा काढला. या मोर्च्यात हजारो महिला हंडी-कळशी घेऊन सामील झाल्या होत्या. (Question of women in the march for water in Diva city)

हे देखील पहा -

पाण्याचा प्रश्न त्वरित मार्गा लागला नाही तर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आंदोलकांकडून देण्यात आला. आंदोलनात भाजप आमदार संजय केळकर, BJP MLA Sanjay Kelkar आमदार निरर्जन डावखरे, भाजप पदाधिकारी अँड आदेश भगत, आणि हजारो महिला सहभागी झाल्या होत्या.

भाजप आमदार संजय केळकर म्हणाले शिवसेना Shivsena केवळ विकासाच्या गप्पा मारते या दिव्यामध्ये एवढ्या मोठ्या संख्येने लोकवस्ती आहे आणि साधं पाण्याचे नियोजन देखील केलेलं नाही. टँकर लॉबीला खतपाणी घालणं पाणी माफियांना खतपाणी घालणं हेच इथल्या शिवसेनेचं काम आहे

मोर्चावेळी दिव्यातील महिला रहिवासी अर्चना पाटील यांनी सांगितले की आज ८ नगरसेवक दिव्याला लाभलेले आहेत.पश्चिमेला एकूण ३ नगरसेवक गावकरी असून देखील गावकऱ्यांना पाणी मिळत नाही आहे. मग हे करतात काय? आम्ही अनेक वेळा आंदोलने केली आहेत. आम्ही हेच करत राहणार का या नगरसेवकांना जाग कधी येणार? असा सवाल त्यांनी विचारला.त्यामुळे ठाणे महापालिका प्रशासन आणि नगरसेवक लक्ष देणार का हे आता पहावे लागेल.

दिवा शहरातील नगरसेवक करतात तरी काय?  पाण्यासाठी काढलेल्या मोर्चात महिलांचा सवाल
बॉलिवूडच्या पार्ट्याना जायला सुद्धा अवकात लागते; 'या' शिवसेना आमदारांचा राणे कुटुंबियांवरती हल्लाबोल!

दरम्यान दिवा भाजप अध्यक्ष आदेश भगत यांनी सांगितले दिवा पश्चिमेस पाणीपुरवठा करण्यात सत्ताधारीअपयशी ठरले आहेत. आज मोठ्या प्रमाणात लोक या मोर्चात सहभागी झाले आहेत, त्यावरून लक्षात येत आहे की इथल्या पाणी प्रश्‍न किती गंभीर आहे आणि इथे असलेले पाणी माफिया सुस्त प्रशासन आणि इथले लोकप्रतिनिधी यांच्या झालेली अभद्र युती आहे.त्यामुळेच इथल्या लोकांना भीषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत असल्याच ते म्हणाले.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com