रिक्षात प्रवाशांच्या ऐवजी बसला भलामोठा अजगर; चालकासह प्रवाशांची पळापळ

वन विभागाने अजगरास नैसर्गिक अधिवास साेडलं.
titwala, python, auto rickshaw
titwala, python, auto rickshawsaam tv
Published On

टिटवाळा : रिक्षात (rickshaw) प्रवाशांच्या ऐवजी भलामोठा अजगर (python) येऊन बसल्याची घटना नुकतीच समाेर आली आहे. टिटवाळा (titwala) शहरातील एका रिक्षात चक्क अजगर बसला हाेता. या भल्या माेठ्या अजगरास पाहताच रिक्षा चालकासह प्रवाशांची पळापळ झाली. दरम्यान सर्पमित्रांनी अजगरास पकडून त्याला नैसर्गिक अधिवासात साेडलं. त्यानंतर रिक्षाचालकासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या सर्वांना हायसं वाटलं. (titwala latest marathi news)

पावसाळ्यात विषारी- बिन विषारी साप मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याच्या घटना घडत आहे. घटनेत टिटवाळा परिसरात उभ्या असलेल्या रिक्षामध्ये तब्बल ५ फुटी अजगर शिरल्याने भयभीत झालेल्या रिक्षा चालकाने वाॅर फाऊंडेशनच्या सर्पमित्राला संपर्क केला.

titwala, python, auto rickshaw
World Athletics Championship 2022 : नीरज पाठोपाठ भालाफेकीत रोहित यादव चमकला; सहा खेळाडू अंतिम फेरीत

त्यानंतर सर्पमित्र सागर म्हात्रे हे घटनास्थळी पाेहचले. त्यावेळी अजगर रिक्षात मागच्या बाजूस हाेता. म्हात्रे यांनी त्यास काैशल्याने पकडलं. रिक्षातून बाहेर काढलं. या अजगरास एका ड्रममध्ये ठेवण्यात आले. या अजगराला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात दिले. त्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने व वनपाल रामदास घोरले यांच्या मार्गदर्शनाखाली अजगरास नैसर्गिक अधिवासात साेडण्यात आलं. यावेळी वाॅर फाऊंडेशनचे अध्यक्ष योगेश कांबळे , प्राणीमित्र प्रेम आहेर, रेहान मोतीवाला , रोमा त्रिपाठी, वनविभागाचे कर्मचारी जयेश घुगे व वनरक्षक दळवी उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

titwala, python, auto rickshaw
थांबा ! वाघ येताेय..; एन्ट्रीच अशी की महामार्गावरील वाहतूकच थांबली (व्हिडीओ पाहा)
titwala, python, auto rickshaw
Satara Breaking News : कोयना परिसराला भूकंपाचा सौम्य धक्का
titwala, python, auto rickshaw
Monty Norman : जेम्स बाॅण्ड थीमचे संगीतकार मॉन्टी नॉर्मन यांचं निधन (व्हिडिओ पाहा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com