Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन

Pune Water Supply Cut : तातडीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामांमुळे पुण्यातील अनेक भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. १९ डिसेंबर रोजी उशिरा व कमी दाबाने पाणी मिळण्याची शक्यता आहे.
Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन
Pune Water Shortage NewsSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील अनेक भागांत २४ तास पाणीपुरवठा बंद

  • बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाकडून तातडीची कामे

  • १९ डिसेंबरला उशिरा व कमी दाबाने पाणी मिळणार

  • नागरिकांना पाणी साठवणुकीचे आवाहन

सागर आव्हाड, पुणे

पुणेकरांनो पाणी जपून वापरा. तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आले असल्याने पुढील २४ तास पुण्यातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. आज १८ डिसेंबर रोजी पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असून शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी उशिरा व कमी दाबाने पाणी नागरिकांना मिळणार आहे.

पुणे महानगरपालिकेच्या बंडगार्डन पाणीपुरवठा विभागामार्फत स्थापत्य विषयक अत्यावश्यक व तातडीच्या देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामांमुळे गुरुवार,आज १८ डिसेंबर रोजी संबंधित भागातील पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार असून शुक्रवार, १९ डिसेंबर रोजी उशिरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.

Water Shortage : पुणेकरांसाठी मोठी बातमी! पुढील २४ तास पाणी राहणार बंद, जाणून घ्या कसं असेल नियोजन
Todya Winter Temprature : महाराष्ट्रात थंडी ओसरली! धुळे, निफाड, जेऊरमध्ये तापमान १० अंशावर; वाचा हवामानाचा अंदाज

या पाणीपुरवठा बंदचा परिणाम येरवडा, संगमवाडी, टिंगरेनगर, विद्यानगर, बडगावशेरी, खराडी, चंदननगर, सोमनाथनगर, विमाननगर, लोहगाव, विश्रांतवाडी, नागपूरचाळ, कल्याणीनगर, धानोरी, कलवड, प्रतिकनगर (अंशतः), कस्तुरबा वसाहत, मोहवाडी, जाधवनगर आदी परिसरांवर होणार आहे. या भागांतील रहिवासी, व्यापारी संस्था तसेच आस्थापनांनी पाणी साठवणूक करून ठेवावी असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com