Pune : पुणेकरांनो सावधान, अति पाणी वापरल्यास कारवाई होणार, पुणे महापालिकेचा इशारा

pune municipal corporation : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. घरात अतिरिक्त पाणी वापरत असाल तर मनपा कारवाई करणार आहे. पाणी सांभाळून वापरावे, असे आवाहनही मनपाकडून करण्यता आले आहे.
Pune Water Issue: पुणेकरांनो पाणी जपून वापरा
Pune Water IssueSaam Tv
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी

Pune Water News : पाण्याचा अधिक वापर केल्यास सोसायट्यांचे नळ कनेक्शन तोडणार असल्याचे पुणे महापालिकनं नागरिकांना इशारा दिला आहे. पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. पुण्यातील नळांना बसवण्यात आलेल्या मीटरमुळे काही सोसायटी पाणी वाया घालत असल्याचा अहवाल महापालिकेला प्राप्त झाला आहे. त्यामुळे पुणे मनपाने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे.

महापालिकेकडून शहरात समान पाणी योजना राबविण्यात येत आहे. या योजने अंतर्गत पालिकेकडून शहरातील पाणी पुरवठ्याचे १४१ झोन तयार करण्यात आले आहेत. त्यातील ४७ झोन तयार झाले आहेत. तर, ४१ झोनमध्ये मीटरद्वारे मुख्य टाकीतून सोडण्यात आलेले पाणी, सोसायटीच्या टाकीत पडलेले पाणी याची मोजणी केली जात आहे.

त्यानुसार,प्रती व्यक्ती १३५ लीटरप्रमाणे सोसायटीने पाणी घेणे आवश्यक आहे. मात्र, काही सोसायट्यांचा पाणी वापर ५०० ते ६०० लीटर पेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. पाण्याचा हाच उपद्रव टाळण्यासाठी महापालिका आता थेट नळ कनेक्शन तोडणार आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा कमी होत चालला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पाणीसाठा सर्वसाधारणपणे तितकाच आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात अनेक ठिकाणी पाणीकपात करण्यात आली होती. मार्च महिना सुरू आहे, पावसाळ्याला आणखी तीन महिन्याचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे पुणे मनपाने जास्त प्रमाणात पाण्याचा वापर कऱणाऱ्यांवर कारवाईचा बडगा करण्याचा निर्णय घेललाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com