Pune Viral Posters: पुण्यात बाहेरून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना जबाबदारीने वागण्याचे धडे, पोस्टर्स व्हायरल

Pune News: बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी जबाबदारीने वागण्याचा सल्ला देणारे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Pune Viral Posters
Pune Viral Posterssaam tv
Published On

Pune Latest News: पुण्यात तरुणींवर झालेल्या हल्यांच्या घटनांनंतर बाहेरून शिकायला आलेल्या विद्यार्थ्यांना जबाबदारीने वागण्याचे धडे देण्यात येत आहेत. बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांनी जबाबदारीने वागण्याचा सल्ला देणारे पोस्टर्स सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यावरून उलट सुलट चर्चेला सुरुवात झालीय.

शिक्षणासाठी पुण्यात आलेले विद्यार्थी आणि विद्यार्थिनी स्वैर वागत असून ते शहराचं वातावरण खराब करत आहेत. त्यांनी अभ्यासावर लक्ष देण्याची गरज असल्याचं म्हणत वेळीच सुधारा असा खोचक सल्ला देण्यात येत आहे. त्याचवेळी मुलांनी गैरवर्तन टाळावं, पुणेकर त्यांच्या मदतीसाठी सैदव तत्पर आहेत, असे अश्वासन देणाऱ्या पोस्ट देखील व्हायरल होत आहेत. (Breaking News)

Pune Viral Posters
Samruddhi Mahamarg Accident: 'अम्मी जा रही हूँ', जोयाचे ते शब्द ठरले शेवटचे

पुण्यातील सदाशिव पेठेत काही दिवसांपूर्वी एका तरुणाने कोयत्याने तरुणीवर हल्ला केल्याची घटना घडली होती. या घटनेने संपूर्ण पुणे हादरलं. राज्यभरात या घटनेची चर्चा झाली. त्यापूर्वी एमपीएसची उत्तीर्ण दर्शना पवारच्या हत्येमुळे पुणे चर्चेत आलं होतं. दर्शनाच्या मित्रानेच तिची हत्या केल्याचेही समोर आले. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारींच्या घटना सतत चर्चेत आहेत. (Marathi Tajya Batmya)

Pune Viral Posters
Buldhana Accident Updates: बुलडाण्यातील अपघातानंतर ट्रॅव्हल्स एजन्सीचा हलगर्जीपणा उघड, फक्त नाव आणि क्रमांकावर बुकिंग

या गुन्हेगारीमुळे पाट्यांसाठी प्रसिद्ध असलेल्या पुणेकरांनी आता थेट सोशल मीडियावर बॅनर व्हायरल करून बाहेरून पुण्यात येणाऱ्या तरुणांना जबाबदारीने वागण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जबाबदारीने वागलात तर पुणेकर सदैव तुमच्यासाठी हजर असल्याचेही या पोस्टर्समध्ये म्हटले आहे. पुण्यात सध्या हे पोस्टर्स चर्चेचा विषय ठरले आहेत. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com