Buldhana Accident Updates: बुलडाण्यातील अपघातानंतर ट्रॅव्हल्स एजन्सीचा हलगर्जीपणा उघड, फक्त नाव आणि क्रमांकावर बुकिंग

Samruddhi Mahamarg Travels Accident: बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गांवर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला.
Samruddhi Mahamarg Travels Accident
Samruddhi Mahamarg Travels Accidentsaam tv
Published On

>> चेतन व्यास, साम टीव्ही

Buldhana Travels Accident News: प्रवासासाठी अनेकांकडून खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करण्यात येतो. यात सुरक्षिततेची बाब असल्याचे अनेकदा समोर आली आहे.आता तर यात प्रवासी कोण कुठला याचीही नोंद ठेवली जात नसल्याचे बुलडाणा येथील घटनेने समोर आले आहे. प्रवाशांची तिकीटं काढताना येथे केवळ त्याचं पहिलं नाव आणि मोबाइल क्रमांकच घेण्यात येतात. त्यामुळे आज घडलेल्या घटनेत मृतांची ओळख पटविण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत.

बुलडाणा जिल्ह्याच्या सिंदखेडराजाजवळ समृद्धी महामार्गांवर विदर्भ ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला. या अपघातात मृत आणि जखमी प्रवाशांची ओळख पटविण्यासाठी प्रशासनाला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ट्रॅव्हल्समधील प्रवाशांच्या यादीनुसार बसमध्ये एकूण ३० प्रवासी असल्याचे समोर आले आहे.

Samruddhi Mahamarg Travels Accident
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ञांमार्फत अभ्यास होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मात्र, या यादीत प्रवाशांची केवळ नावे आणि मोबाइल क्रमांकच उपलब्ध होते. एकाही प्रवाशाची पूर्ण माहिती नसल्याने या बसमध्ये नेमके कोण होते हे शोधण्यासाठी प्रशासनाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. विदर्भ ट्रॅव्हल्सच्या या अपघातात वर्ध्यातील 15 प्रवाशी होते त्यापैकी 14 प्रवाश्यांचा मृत्यू झाला तर एक जखमी आहे.

सकाळी अपघाताची माहिती मिळताच संपूर्ण वर्धा शहरात खळबळ उडाली होती. पोलीस प्रशासनासह जिल्हा प्रशासनच्या अधिकाऱ्यांसह यात असलेल्या प्रवाशांच्या नातलगांनीही बुलढाण्याकडे धावाधाव सुरू केली. वर्ध्याच्या पराग ट्रॅव्हलमधून एकूण पंधरा प्रवाशांनी तिकीट बुक केली होती. बुक करताना प्रवाशाचे केवळ नाव आणि मोबाइल क्रमांक घेण्यात आल्याने त्यांची ओळख पटवण्यात अनेक अडचणींचा सामना करावा लगला. (Breaking News)

Samruddhi Mahamarg Travels Accident
Samruddhi Highway Accident: अपघातातील मृतांची ओळख पटविण्यात अडचण, कुटुंबियांशी चर्चा करून सामूहिक अंत्यसंस्काराचा निर्णय

या घटनेत ट्रॅव्हल्ससह २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेत ट्रॅव्हल्स बसचा अक्षरश: कोळसा झाला. घटनेची माहिती मिळताच नातलगांनी या ट्रॅव्हल्समध्ये असलेल्या आपल्या संबंधितांना मोबाईल लावण्याचा प्रयत्न केला. पण, त्यांचा संपर्क होत नसल्याने सारेच धावपळ करीत होते. (Marathi Tajya Batmya)

ट्रॅव्हल्सची तिकीट काढताना प्रवाशाचे पहिले नाव आणि मोबाईल क्रमांक नोंद करण्यात येतो. अनेक दिवसांपासून आमची हीच पद्धत आहे. यात घडलेली घटना भीषणच आहे, असं वर्ध्यातील ट्रॅव्हल्स एजन्ट विनायक नागपूरे यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com