Pune Traffic Update: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक ठप्प; रस्त्यावर ३ किलोमीटर वाहनांच्या रांगा

Pune Traffic Update: मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
Pune Traffic Update
Pune Traffic UpdateSaam tv
Published On

सचिन जाधव

pune News: पुण्यातील ट्रॅफिकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे या महामार्गावर तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. तर मुठा नदी पूल परिसरात रस्त्यावर मोठे खड्डे पडल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे, अशी माहिती समोर आली आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील ट्रॅफिकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे तीन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना तासंतास गाडीत बसून पुढे जाण्यासाठी वाट पाहावी लागत आहे.

Pune Traffic Update
Railway Track Crack: मानवत रोड ते सेलू दरम्यान रेल्वेरूळ तुटला; गँगमनच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

मुठा नदी पुल परिसरात मोठे खड्डे पडल्याने या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर वडगाव बुद्रुक येथील मुठा नदी पूल परिसरात रस्त्यावर पडलेल्या मोठं-मोठ्या खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झालेली आहे.

नदी पुलापासून नवीन कात्रज बोगद्यापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहन चालक,नागरिक,कामगार,हैराण झाले आहेत. वडगाव, धायरी, नऱ्हे,आंबेगाव परिसरातील सर्व सेवा रस्ते वाहतूककोंडीमुळे ठप्प झाल्या आहेत.

Pune Traffic Update
Railway Track Crack: मानवत रोड ते सेलू दरम्यान रेल्वेरूळ तुटला; गँगमनच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली

'नदी पुलावर रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक व्यवस्था कोलमडल्याची परिस्थिती आहे. ही वाहतूक व्यवस्था वारजे , सिंहगड भारती विद्यापीठ पोलिसांच्या वतीने सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याबाबत महामार्ग प्रशासनाला माहिती कळविली आहे. परंतु याची दखल घेण्यात आलेली नाही, अशी प्रतिक्रिया सिंहगड वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पांडुरंग वाघमारे यांनी दिली आहे .

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com