पुणेकरांचा प्रवास बदलतोय! खासगी गाड्यांऐवजी मेट्रो–पीएमपीएमएलकडे वाढता कल

Pune Metro Daily Ridership Growth: पुण्यात वाढत्या ट्रॅफिकवर उपाय म्हणून पुणेकरांचा कल सार्वजनिक वाहतुकीकडे वाढतोय. मेट्रोचा विस्तार, पीएमपीएमएलच्या इलेक्ट्रिक बसेस आणि हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांचा बदलता प्रवास पाहा या विशेष रिपोर्टमध्ये.
PUNE TRAFFIC SOLUTION: METRO EXPANSION AND ELECTRIC BUSES CHANGE COMMUTE
PUNE TRAFFIC SOLUTION: METRO EXPANSION AND ELECTRIC BUSES CHANGE COMMUTESaam Tv
Published On

पुणे आणि ट्रॅफिक हे समीकरण आता बदलू लागलंय. पुण्यात खासगी वाहनांची संख्या वाढली असली, तरी पुणेकरांचा कल आता सार्वजनिक वाहतुकीकडे वाढताना दिसतोय. विशेषतः हिंजवडीसारख्या आयटी पार्कमध्ये जाणारे इंजिनिअर्स आता स्वतःची गाडी सोडून PMPML बस आणि पुणे मेट्रोला पसंती देतायंत.

पुण्यातील हिंजवडीसारख्या आयटी हबमध्ये जाणारा नोकरदारवर्ग स्वतःच्या गाड्यांना किंवा कॅबला पसंती देत होता. मात्र, आता हे चित्र बदलतंय. वाहनांची गर्दी आणि ट्रॅफिक जॅम टाळण्यासाठी पुणेकर आता मोठ्या संख्येने सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय निवडत आहे... मेट्रोचं जाळं शहरात वेगाने विस्तारतंय, त्यामुळे पुण्याच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकाला जाणं अधिक जलद होणार आहे. मेट्रोच्या सध्याच्या स्थितीवर एक नजर टाकूया.

मेट्रोचा विस्तार आणि प्रवासी

- मेट्रोचा सध्या 33 किमी मार्ग सुरू

- दररोज 2.23 लाख प्रवाशांचा प्रवास

- नवीन 45 किमीचे काम सुरू

- लवकरच 27 किमीचा टप्पा सेवेत

पुण्यात सध्या ३३ किलोमीटर लांबीचा मेट्रो मार्ग पूर्ण झाला असून यावरून दररोज सरासरी सव्वादोन लाखांहून अधिक प्रवासी प्रवास करत आहेत. विशेष म्हणजे पुण्यात अतिरिक्त ४५ किलोमीटर लांबीच्या मार्गाचे काम प्रगतीपथावर असून, यापैकी २७ किलोमीटरचा टप्पा लवकरच प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे...

एका बाजूला मेट्रोचा विस्तार आणि दुसऱ्या बाजूला पीएमपीएमएलचं सक्षम जाळं, यामुळे पुण्याच्या वाहतुकीचं चित्र पालटून गेलंय. महापालिकेत सत्ता असताना भाजपने पुणे मेट्रोसोबतच पीएमपीएमएल सक्षम करण्यावरही विशेष भर दिला. पुण्यात देशातील सर्वात मोठा इलेक्ट्रिक बसचा ताफा उभा राहिलाय. विशेष म्हणजे डिसेंबर अखेरपर्यंत शहरातील डिझेलवर चालणाऱ्या बस हद्दपार करून प्रदूषण कमी करण्याच उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. प्रदूषणमुक्त आणि गतिमान प्रवासाच्या दिशेने पुण्याची ही वाटचाल इतर शहरांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com