
अक्षय बडवे, साम प्रतिनिधी
नववर्षाचं स्वागत करताना दारू पार्टी करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. दारू पिऊन गाडी चालवणाचा पराक्रम करत असाल तर तुमची ही चूक महागात पडू शकते. दारू पिऊन गाडी चालवाल तर तुम्हाला तुरुंगवारी होईल. दरम्यान ३१ डिसेंबरच्या रात्री पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.
पुण्यासह देशभरात ३१ डिसेंबर रोजी सगळे जणं नवं वर्षाच्या स्वागत करण्यासाठी धूम धडाक्यात पार्टी करतात. याच पार्टी दरम्यान अनेक जणं चक्क दारू पिऊन गाडी चालवतात परिणामी अपघात होण्याची शक्यता पण जास्त असते त्यामुळेच हा धोका लक्षात घेता पुण्यात ३१ डिसेंबर रोजी रात्री ठिकठिकाणी वाहतूक पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात येणार आहे. वाहन चालकाने मद्य प्राशन केले आहे का हे तपासण्यासाठी पोलिसांकडून ब्रेथ एनालायझर या मशीन ची मदत घेतली जाणार आहे.
तुम्ही किती ही लपवा लपवी केली तरी सुद्धा या मशीनपासून तुमची सुटका होणार नाही हे ही खरं. एखादा वाहन चालक मोठा दंड तर होईलच पण जेलची हवा सुद्धा खावी लागणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं. नेमकं हे ब्रेथ एनालायझर मशीन काम कसं करतं याचा आढावा घेऊया. ३१ डिसेंबरच्या रात्री जे वाहनधारक असतील त्यांना वाहतूक पोलिसांनी थांबवलं तर त्यांना तपासणीला सामोरे जावं लागेल.
ब्रेथ एनालायझर मशीनमधून वाहनचालकाने दारू प्यायली का नाही, हे तपासलं जाईल. प्रत्येक वाहनचालकाला ब्रेथ एनालायझर मशीनच्या पाइपमध्ये फुकावं लागेल. जर तुम्ही दारू प्यायला नसला तर मशीनमध्ये नो अल्कोहोलच सिंग्नल येतं. जर तुम्ही दारूचं सेवन केलेलं असेल तर या मशीनमधून एक चलान येईल. तसेच तुम्ही दारू प्यायलेले आहात हे या मशीनमधून सिंग्नल द्वारे सुद्धा दाखवलं जाईल. वाहन चालकांची तपासणी करत असताना प्रत्येकवेळी ब्रेथ एनालायझर मशीनचा पाइप ज्यातून वाहन चालकाला फुकायचं असतं तो पाइप प्रत्येकवेळी बदलण्यात येतो. जेणेकरून काही संसर्ग होणार नाही.
जास्त दारू पिऊन गाडी चालवण्यामुळे अपघात होत असतात, त्यामुळे हॉटेल असोसिएशनने थर्टी फस्टच्या रात्री ग्राहकांना दारू देण्याबाबत नवी नियम जारी केलाय. ग्राहकांना त्या रात्री फक्त ४ पेग दारू पिण्यासाठी मिळेल. थर्टी फस्टच्या रात्री हॉटेल रात्रभर चालू राहतील पण त्यात मिळणारी दारू मात्र लिमिटेड असेल. हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये चार पेगपेक्षा जास्त पेय पिण्यास परवानगी दिली जाणार नाही. लोकांना सुरक्षित ठेवण्याचे कारण आहे. अल्कोहोलच्या अतिरेकामुळे अपघाताचा धोका वाढतो, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं हॉटेल असोसिएशनने सांगितलंय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.