Vasant More: 'प्रयत्नांची पराकाष्ठा केली रे, मित्रा नियतीपुढे हरलो'; 'लंगोटीयार'च्या निधनानं वसंत मोरे हळहळले

Vasant More Emotional Post : मित्राच्या निधनानंतर आठवणींना उजाळा देताना वसंत मोरे यांनी म्हटलं आहे की, 'प्रवीण हा शाळेपासूनचा मित्र होता. आमचा ५० पेक्षा जास्त लोकांचा 'लंगोटी यार' नावाचा ग्रुप आहे.
vasant more emotional post on social media
vasant more emotional post on social media Saam TV News
Published On

पुणे : 'शेवटच्या क्षणी त्याला माझी आठवण झाली, पण भेट होण्याआधीच तो निघून गेला...' अशी हळवी आठवण सांगत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी आपल्या जिवलग मित्रासाठी सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर केली आहे. वसंत मोरे यांचे बालपणीचे मित्र प्रवीण धर्माधिकारी यांचं नुकतंच दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या दोन वर्षांपासून ते आजारी होते. आतड्याच्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा निर्माण झाल्याने त्यांना वारंवार त्रास होत होता. मोरे यांनी त्याच्या उपचारासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. मात्र त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही आणि प्रवीण धर्माधिकारी यांचं निधन झालं.

मित्राच्या निधनानंतर आठवणींना उजाळा देताना वसंत मोरे यांनी म्हटलं आहे की, 'प्रवीण हा शाळेपासूनचा मित्र होता. आमचा ५० पेक्षा जास्त लोकांचा 'लंगोटीयार' नावाचा ग्रुप आहे. प्रवीण हा त्या ग्रुपमधील अतिशय जिवलग मित्र. आम्ही महिन्यातून एकदा तरी भेटत असू. तो सेंट बनवायचा आणि नेहमी मला सेंट भेट म्हणून देत असे. प्रविणची टपरी होती. १ मे रोजी रांगोळी स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही भेटलो होतो. तो काही महिन्यांपूर्वी नातेवाईकाच्या लग्नातही जोमाने नाचताना दिसला होता. त्या आठवणी अजूनही मनात ताज्या आहेत.'

मित्राच्या आठवणींविषयी बोलताना वसंत मोरे म्हणाले की, 'आजार झाल्यानंतर आम्ही त्याला भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल केलं होतं. काही काळासाठी त्याची तब्येत सुधारली होती, पण या महिन्यात पुन्हा त्रास सुरू झाला. डॉक्टरांचा अहवाल निगेटिव्ह होता. मी सासवडला सुनावणीला जात असताना त्याच्या मुलाचा फोन आला, 'बाबांना तात्याला शेवटचं भेटायचंय.' पण मी पोहोचायच्या आधीच त्याने शेवटचा श्वास घेतला होता,' असं म्हणत मोरे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com