Accident Deaths In Pune : पुण्यात दररोज सरासरी एकाचा अपघाती मृत्यू; सर्वाधिक अपघात कुठे? आकडेवारी चिंता वाढवणारी

Pune Accident : पुण्यातील अपघात रोखण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर आहेच, पण या अपघातांतील मृत्यूची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे.
Pune Accident deaths News In Marathi
Pune Accident deaths News In MarathiSAAM TV

अक्षय बडवे, पुणे

Pune Accident and Deaths Latest Data : पुण्यातील कोंढवा परिसरात नुकताच ११ वाहने एकमेकांना धडकून विचित्र अपघात झाला होता. या घटनेत एकाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर पुण्यातील अपघातांच्या घटनांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे, गेल्या सहा महिन्यांतील पुण्यातील रस्ते अपघातांची आणि मृत्यूची आकडेवारी समोर आली आहे. अपघात रोखण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर आहेच, पण या अपघातातील मृत्यूची संख्या ही चिंता वाढवणारी देखील आहे. (Latest Marathi News)

पुण्यातील वाहतूक कोंडीची (Pune Road Traffic) समस्या मोठी आहे, तितकाच जटील प्रश्न शहरातील रस्ते अपघातांचा आहे. पुण्यातील रस्त्यांवर भीषण अपघात झाले आहेत आणि त्यात अनेकांचा जीव देखील गेला आहे. वाहतूक विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरात दररोज सरासरी एका व्यक्तीचा अपघाती मृत्यू होतो.

Pune Accident deaths News In Marathi
Pune Accident Video: पुण्यातल्या ११ वाहनांच्या विचित्र अपघाताचा भयानक व्हिडिओ; उतारावर भरधाव ट्रेलर आला अन्...

पुणे शहर (Pune City) पोलीस आयुक्तालयातील वाहतूक शाखांपैकी सर्वाधिक अपघाती मृत्यू हे लोणीकंद भागात झाले आहेत. १ जानेवारी ते ३१ जुलै या सहा महिन्यांच्या कालावधीतील आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. लोणीकंदमध्ये या कालावधीत ३२ अपघात झाले आहेत. त्यात ३३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

लोणी काळभोरमध्ये गेल्या सहा महिन्यांत २७ अपघातांची नोंद झाली आहे. यात २७ जणांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी पुणेकरांसाठी चिंताजनक आहेच, शिवाय शहरातील अपघात रोखण्याचे मोठे आव्हान वाहतूक पोलिसांसमोर आहे.

Pune Accident deaths News In Marathi
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर तीन वाहनांचा विचित्र अपघात; दोन ट्रक जळून खाक

वाहतूक शाखा विभागनिहाय रस्ते अपघातांची सर्वाधिक नोंद असणारे परिसर (१ जानेवारी ते ३१ जुलै)

लोणीकंद

अपघात - ३२

मृत्यू - ३३

लोणी काळभोर

अपघात - २६

मृत्यू - २७

भारती विद्यापीठ

अपघात - २१

मृत्यू - १८

हडपसर

अपघात- १६

मृत्यू - १५

हांडेवाडी

अपघात - १३

मृत्यू- १३

वारजे, कोंढवा

अपघात - ८

मृत्यू - ९

विमानतळ, कोथरूड, सिंहगड रोड

अपघात - ८

मृत्यू - ८

वानवडी

अपघात - ५

मृत्यू - ५

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com