पुणे चक्राकार मार्गामुळे पुणे, पिंपरी-चिंचवड, पीएमआरडीए क्षेत्रात विकासाच्या नवीन संधी तसेच अडीच लाख कोटी रुपयांची अर्थव्यवस्था नव्याने निर्माण होणार आहे; हा मार्ग येत्या काळात पुण्याच्या विकासाचे ते इंजिन ठरेल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील ससून रुग्णालय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांकरीता नूतन निवासी इमारत, महात्मा गांधी पूलगेट बसस्थानकाचे आधुनिकीकरण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराचा विकास, संगम घाटावरील संगमेश्वर गणेश विसर्जन घाट नूतनीकरण व नागरिकांसाठी निवारा केंद्र, आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल उद्यानाच्या भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुणे रिंगरोड महत्त्वाचा असून त्यासाठी ८० टक्के भूसंपादन पूर्ण होत आहे. येत्या काळात या मार्गाचे काम सुरु करण्यात येणार आहे. आयटीपार्कच्या भागात आस्थापनांपर्यत जाण्यासाठी मेट्रोला जोडून स्कायबस सुरू करण्यात येणार असून येत्या काळात भूमीपूजन करण्यात येणार आहे. यामुळे आस्थापनांपर्यंत जाण्यासाठी वाहनाची आवश्यकता लागणार नाही आणि प्रदूषण होणार नाही. (Latest Marathi News)
पुणे शहरात २४ X ७ पाणी पुरवठा योजना, नदी सुधार कार्यक्रम यासारख्या विविध प्रकारच्या योजना राबवून विकास कामांच्या माध्यमातून शहराचे चित्र बदलण्याचे काम सुरु आहे. पीएमपीएलच्या माध्यमातून देशातील पहिली इलेक्ट्रीक बसची फ्लिट पुणे शहरात केली आहे. पुण्याचे या मॉडेलची देशात अंमलबजावणी करण्यात येत असून विविध शहराने ते स्वीकारले आहे. मेट्रोचे कामे अतिशय गतीने करण्यात येत आहे. सिव्हील कोर्ट ते स्वागेट मेट्रोचे मुठा नदीच्या गर्भातून भुयारी चाचणी घेण्यात आली असून येत्या काळात मेट्रोचे तीन्ही मार्ग मिळून एकूण ५४ कि.मीचे मेट्रोचे जाळे सुरु करण्यात येत आहे. येत्या वर्षभरात टाटाच्या मेट्रोचे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसर सौदर्यीकरण आणि ससून रुग्णालय चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांकरीता अतिशय अद्ययावत प्रकारचे निवासस्थान तयार करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या माणसाचा विचार केला असून त्याच विचाराला अनुसरून चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना राहण्याची व्यवस्था होत आहे. महात्मा गांधी पूलगेट बसस्थानकाचा नीट नियोजन करत सर्वांगिण गरजांचा विचार करुन आराखडा तयार करण्यात आला आहे. संगम घाट येथील निवारा केंद्र आणि गणेश विसर्जनाचे नुतनीकरण तसेच छत्रपती संभाजी महाराज बॉटनिकल गार्डन तयार करण्यात येत आहे. विविध विकास कामांच्या माध्यमातून पुणे कॅन्टोन्मेंटमट विधानसभा मतदारसंघात बदल होतांना दिसून येत आहे.
पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघात संरक्षण विभागाचा भाग असल्याने निर्बंध असून महानगरपालिका आणि शासनाला विकास करतांना समस्या निर्माण होत आहे. महानगरपालिकेप्रमाणे दिल्या जाणाऱ्या वस्तु व सेवाकर स्वरुपात परतावा दिला जातो त्याप्रमाणे कॅन्टोन्मेंट मंडळाला निधी मिळण्याबाबत पाठपुरावा करण्यात येईल. महानगरपालिका क्षेत्रातील योजना कॅन्टोन्मेंट मंडळाला लागू करण्याबाबत येत्या काळात पुणे महानगरपालिका, नगर विकास विभाग आणि सर्व संबंधित विभागासोबत बैठक घेण्यात येईल, अशा कॅन्टोन्मेंट मंडळातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.