पुणे : पुणे महापालिकेत (PMC) समाविष्ट झालेल्या 20 ग्रामपंचायतींमध्ये बोगस नोकर भरती झाल्याचे स्पष्ट झाले असून या प्रकरणात 22 अधिकार्यांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी 16 जणांना निलंबित करण्यात आले असून, संबंधित ग्रामपंचायतींतील 212 माजी ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. (Pune recruitment case exposed)
हे देखील पहा -
पुणे महापालिकेत (Pune Municipal Corporation) समाविष्ट होण्यापूर्वी 20 ग्रामपंचायतींमध्ये चुकीच्या पद्धतीने कर्मचारी नियुक्त करण्यात आल्याच्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी तत्कालीन महिला व बालविकास अधिकारी (Women and Child Development Officer) दत्तात्रय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली होती. या समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर सादर केला आहे. काही प्रशासकांनी ग्रामपंचायतींमध्ये कार्यरत असताना नियमबाह्य नोकर भरती केल्याचा आरोप निश्चित करण्यात आला आहे.
त्यानुसार 14 ग्रामसेवक आणि दोन कृषी विस्तार अधिकाऱ्यांना निलंबित (Suspended) करण्यात आले आहे. या 20 ग्रामपंचायती पुणे महापालिकेत जाण्यापूर्वी 658 जणांची भरती करण्यात आल्याची माहिती चौकशीतून समोर आली आहे.
Edited By - Jagdish Patil
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.