Video : झिका पुण्यात आला कुठून ? तुम्हाला - आम्हाला पडलेल्या बुचकळ्यात टाकणाऱ्या प्रश्नावर खास रिपोर्ट

zika virus cases found in pune : पुण्यात ऐन वारीच्या तोंडावर झिकाचे तीन रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे झिका आफ्रिका, अमेरिका आणि दक्षिण भारतात आढळतो. मात्र लागण झालेल्या रुग्णांनी कुठेही प्रवास केलेला नाही. त्यामुळे झिका पुण्यात आला कुठून हा मोठा प्रश्न आहे. पाहूया एक रिपोर्ट...
पुणेकरांनो डासांपासून सावध राहा; शहरात झिका व्हायरसचे आढळले 3 रुग्ण
Zika Virus Patient Found In HadapsarSaam Tv

पुणे : राज्यात जीवघेण्या झिका व्हायरसचे रुग्ण आढळल्यानं आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. पुणे शहरात आणखी एक झिकाचा रुग्ण आढळला आहे. हडपसरमध्ये झिका विषाणूचा संसर्ग असलेला रुग्ण सापडला आहे. त्यामुळे पुणे शहरातीव झिका रुग्णांची संख्या 3 वर पोहोचली आहे.

पुण्यातील कोथरूड येथील एरंडवणे भागात एका ४६ वर्षीय डॉक्टर आणि त्यांच्या १३ वर्षीय मुलीमध्ये झिकाची लक्षणं आढळली. डास चावल्यामुळे या दोघांना झिकाची लागण झाली आहे. आता हडपसरमधील एका रुग्णाची भर पडल्यानं पुणे महानगरपालिका अॅक्शन मोडवर आली आहे. संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनानं अनेक ठिकाणी उपाययोजना सुरु केल्या आहेत.

पावसाळ्यामुळे अनेक आजार डोकं वर काढू लागले आहेत. याचदरम्यान, झिकाचे तीन रुग्ण आढळल्यानं चिंता व्यक्त होत आहे. झिका व्हायरसचा सर्वाधिक धोका गरोदर महिलांना असल्याचं आरोग्य अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं आहे. झिकाचा प्रसार हा एडिस एजिप्ती डासापासून होतो.

झिका पसरतो कसा ते पाहूया

झिका हा डासांपासून पसरणारा विषाणू आहे. एडिस डास चावल्यानं झिकाचा संसर्ग होतो.हे डास केवळ रात्रीच नाही तर दिवसाही चावतात. हा विषाणू गर्भवती महिलेकडून तिच्या गर्भात जाऊ शकतो. गर्भधारणेवेळी संसर्गामुळे काही जन्मजात दोष आढळतात. झिकासाठी कोणतीही लस किंवा औषध नाही.

झिका व्हायरसची लक्षणे काय आहेत ते पाहूया...

- ताप

- पुरळ, रॅशेस

- डोकेदुखी

- सांधेदुखी

- लाल डोळे

- स्नायू दुखणे

झिका झाल्यास काय काळजी घेतली पाहिजे ते पाहूया..

- आराम करा

- डिहायड्रेशन टाळा

- भरपूर पाणी प्या

- ताप आणि वेदना शमण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध घ्या

संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे पालखी सोहळे रविवारी 30 जूनला पुणे शहरात दाखल होणार आहेत. 30 जून आणि 1 जुलैला दोन्ही पालख्या मुक्कामी राहणार आहेत. पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची मोठी गर्दी होणार आहे. त्यात झिकाच्या वाढत्या प्रादुर्भावाने चिंता वाढवली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com