Pune Real Estate: घर घेण्यासाठी अल्प उत्पन्न आणि उच्च मध्यमवर्गाची पुण्याला पसंती; ‘नाइट फ्रँक’ संस्थेचा अहवाल

Pune Real Estate: नाइट फ्रँक संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, पुण्यात या वर्षी जानेवारी महिन्यात १६ हजार ३३० घरांची विक्री झाली आहे.
Pune Real Estate News
Pune Real Estate
Published On

सागर आव्हाड, साम प्रतिनिधी

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या जानेवारी महिन्यात पुण्यामध्ये घरांच्या विक्रीत आठ टक्के घट झालीय. मात्र कमी किमतीच्या घरं घेण्यासाठी नागरिकांना पसंती दर्शवलीय. २५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झालीय. अल्प उत्पन्न आणि उच्च मध्यमवर्गाकडून घरखरेदी अधिक झाल्याचे दिसत आहे.

पुणे शहरातील २५ लाख ते १ कोटी रुपये किमतीपर्यंतच्या घरांच्या विक्रीत ही घट दिसत असल्याने ही एकप्रकारे या वर्गाच्या क्रयशक्तीतील घट मानली जात आहे. मात्र याच वेळी २५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीच्या आणि १ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झाली आहे. विद्येचं माहेरघर म्हणून ओळखलं जाणाऱ्या पुणे शहरातील लोकांना स्वस्त घरं घेण्याकडे नागरिकांचा ओढा आहे. रिअल इस्टेट प्रकरणा अहवाल देणाऱ्या नाइट फ्रँक संस्थेनुसार पुणे शहरात २५ लाख रुपयांपेक्षा कमी किमतीची घरं घेण्यासाठी ग्राहकांनी पसंती दर्शवलीय.

Pune Real Estate News
Mumbai Metro: मुंबई मेट्रो-३ चा दुसरा टप्पा कसा असणार? किती आणि कोणती स्थानके? तिकीट किती?

नाइट फ्रँक संस्थेने जाहीर केलेल्या अहवालानुसार, पुण्यात यावर्षी जानेवारी महिन्यात १६ हजार ३३० घरांची विक्री झाली आहे. गेल्या वर्षी जानेवारीमध्ये १७ हजार ७८६ घरांची विक्री झाली होती. म्हणजेच, गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे दीड हजार घरांची विक्री कमी झालीय. यंदा जानेवारीत घरांच्या विक्रीतून ५९० कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारला मिळाले आहे. गेल्या वर्षी जानेवारीत ५८९ कोटी रुपयांचे मुद्रांक शुल्क मिळाले होते. एक कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झाल्याने मुद्रांक शुल्क संकलनात घट झालेली नाही.

Pune Real Estate News
Pune News : पुणे तिथे काय उणे! ड्रेनेजचं काम सुरु असताना रस्ता खचला, ठेकेदार-कामगारांचा काढता पाय

दस्तनोंदणीसाठी कार्यालये जादा वेळ राहणार सुरू

येत्या आर्थिक वर्षात रेडी रेकनरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. ऐनवेळी दस्त नोंदणीसाठी होणाऱ्या नागरिकांची गर्दी लक्षात घेऊन दस्तनोंदणीची कार्यालये जास्त वेळ सुरू राहणार आहेत. नोंदणी व मुद्रांक विभागाने राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालयाची वेळ दोन तासांनी वाढविली आहे. त्यानुसार आजपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. रेडी रेकनरचे नविन आर्थिक वर्षाचे दर हे ३१ मार्च रोजी शासनाकडून जाहीर केले जातात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com