Vishal Agrawal News: पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट, विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Pune's Kalyaninagar Porsche Car Accident Update: विशाल अग्रवाल हे कारचालक अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील आहेत. १९ मे रोजी मध्यरात्री कल्याणीनगरमध्ये अपघाताची घटना घडली होती यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.
Pune Porsche Accident Update: पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट, विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Vishal Agarwal remanded 14 days of judicial custodySaam TV

पुणे हिट अँड रन प्रकरणी अटकेत असलेल्या कारचालक मुलाचे वडील विशाल अग्रवालची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये करण्यात आली आहे. विशाल अग्रवालची पोलिस कोठडी आज संपली. त्याला कोर्टात हजर केले असता कोर्टाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालसोबत इतर ५ ही आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळे आता विशाल अग्रवाल याचा जामीनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याचे वकील आजच जामीनासाठी अर्ज करू शकतात. विशाल अग्रवाल हे कारचालक अल्पवयीन आरोपी मुलाचे वडील आहेत. १९ मे रोजी मध्यरात्री कल्याणीनगरमध्ये अपघाताची घटना घडली होती यामध्ये दोघांचा मृत्यू झाला होता.

Pune Porsche Accident Update: पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट, विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Pune Accident : पुण्यात भीषण अपघात, एक महिन्याच्या बाळाचा मृत्यू; आईसह दूसरे बाळ जखमी

पोलिस कोठडी संपल्यानंतर आज आरोपींना शिवाजीनगर न्यायालयामध्ये हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांनी विशाल अग्रवालची पोलिस कोठडी ७ दिवसांनी वाढून देण्याची मागणी केली. पण पोलिसांची मागणी कोर्टाने फेटाळून लावली. कोर्टाने विशाल अग्रवालला ७ जूनपर्यंत म्हणजे १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. तर इतर ५ आरोपींना देखील १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोर्टाच्या या निर्णयामुळे यासर्व आरोपींच्या जामिनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यांचे वकील आजच जामिनासाठी अर्ज करू शकतील. सोमवारी त्यांच्या जामिन अर्जावर सुनावणी होऊन त्यांना जामीन मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, या सुनावणीदरम्यान, पोलिस आणि सरकारी वकिलांनी ८ ते १० कारणं दिली होती. आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती. पोलिसांनी आरोपीची पोलिस कोठडी वाढवून देण्यासाठी जी कारणं दिली होती ती सर्व कारणं गरजेची नसल्याचे सांगून कोर्टाने ते बेदखल ठरवली आहेत.

Pune Porsche Accident Update: पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट, विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Pune Porsche Accident : पोलिस निरीक्षकाने माहिती लपवली? खळबळजनक माहिती समोर

या सुनावणीदरम्यान, सर्वच आरोपींच्या वकिलांनी युक्तीवाद केला होता की, पोलिसांनी दिलेल्या कारणांच्या आधारे आरोपींना पोलिस कोठडी वाढवून देण्यात येऊ नये. पोलिसांनी दिलेल्या यासर्व कारणांचा तपास करण्यासाठी आरोपी पोलिसांसाठी उपलब्ध असतील. ते कधीही चौकशीसाठी हजर राहू शकतील असे आरोपींच्या वकिलांनी कोर्टाला सांगितले.

Pune Porsche Accident Update: पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट, विशाल अग्रवालला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
Pune Porsche Accident Case : पोर्शे कार कोण चालवत होता? पुणे पोलीस आयुक्तांनी दिली महत्वाची माहिती

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com