Pune Porsche Car Accident: पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण, दोन्ही डॉक्टरांसह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी

Pune Sassoon Hospital: पुणे हिट अँड रन प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन्ही डॉक्टरांसह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.
Pune Porsche Car Accident: पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण, दोन्ही डॉक्टरांसह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी
Dr Ajay Taware And Dr Shrihari HalnorSaam Tv

नितीन पाटणकर, पुणे

पुणे हिट अँड रन प्रकरणातील (Pune Hit And Run Case) आरोपी मुलाच्या ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणी अटकेत असलेल्या ससून रुग्णालयातील दोन्ही डॉक्टर आणि शिपायाच्या पोलिस कोठडीमध्ये ६ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींची पोलिस कोठडी आज संपली होती. त्यांना कोर्टामध्ये हजर करण्यात आले होते. कोर्टाने ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात डॉ. अजय तावरे, श्रीहरी हळनोर आणि शिपाई अतुल घटकांबळे यांच्या पोलिस कोठडीमध्ये ५ जूनपर्यंत वाढ केली आहे. या तिघांची देखील पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.

ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरणात दोन्ही डॉक्टर आणि शिपाई यांच्याविरोधात लाच लुचपत प्रतिबंधक कायद्यातील सेक्शन नव्याने वाढवण्यात आले आहे. त्यामुळे या तिघांच्याही अडचणीमध्ये वाढ होणार आहे. ⁠ब्लड सॅम्पल बदलण्यासाठी घेतलेले पैसे म्हणजे लाच असल्याचा पुणे पोलिसांनी आरोप केला आहे. ⁠हे सेक्शन लावल्याने आता ओरीपींचे न्यायालय बदलले. आता त्यांना जेएमएफसी ऐवजी एसीबीसाठीच्या विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. पुणे पोलिसांनी सुनावणीदरम्यान आरोपींची पोलिस कोठडी वाढवून मागितली. न्यायालयाने आरोपींच्या पोलिस कोठडीमध्ये ६ दिवसांची म्हणजे ५ जूनपर्यंत वाढ केली आहे.

Pune Porsche Car Accident: पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण, दोन्ही डॉक्टरांसह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी
Pune Porsche Accident: ससूनमध्ये राष्ट्रवादीचा कंट्रोल? Anjali Damaniya यांचा सनसनाटी आरोप! पाहा EXCLUSIVE

न्यायालयामध्ये सुनावणीदरम्यान तपास अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुलाचे रक्त काढलेल्या सिरींज डस्बीनमध्ये न टाकता इतर कोणाला तरी हस्तांतरीत केल्या आहेत. त्याचा शोध घ्यायाचा आहे. ⁠जे रक्त बदलले गेले ते एका महिलेचे होते हे तपासात निष्पन्न झाले आहे. ती महीला कोण होती याचा तपास करायचा आहे. तावरेंच्या मालमत्तेचा पूर्ण तपास करायचा आहे. झडती घ्यायची आहे. त्याचे काही पुरावे सापडण्याची शक्यता आहे. ⁠इतर कोणाची मदत या तीन आरोपींना झाली याचा शोध घ्यायचा आहे. ⁠गुन्ह्याच्या काळात हे तिघे सोशल मीडियाच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. ⁠२.५ लाख रुपये हळनोर आणि ५० हजार अतुल घटकांबळे यांच्याकडून जप्त करण्यात आले आहे.'

Pune Porsche Car Accident: पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण, दोन्ही डॉक्टरांसह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी
Pune Hit and Run Case : पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण; डॉक्टरांना रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आर्थिक रसद कोणी पुरवली? पोलिसांकडून शोध सुरु

सरकारी वकिलांनी युक्तीवाद केला की, 'मुलाचे ब्लड सॅम्पल अशा ठिकाणी घेण्यात आले जिथे सीसीटीव्ही नाही. व्हॅाट्सअप कॅाल आणि संवाद ताब्यात घेतलेला आहे. त्यात इतर कोणाचा सहभाग होता याचा तपास घ्यायचा आहे. विशाल अग्रवाल आरोपींच्या संपर्कात होता हे तपासात पुढे आले आहे.'

तर आरोपीच्या वकिलाने युक्तीवाद केला की, '२६ तारखेला ताब्यात घेतले तेव्हाच सर्व माहीती जसे की, सीसीटीव्ही, व्हॅाटस्अप चॅट, संभाषण, रजिस्टर पोलिसांना मिळाले आहे. ⁠२७ तारखेला हीच कारणे देण्यात आली होती. ⁠घटनेच्या वेळी तावरे घटनास्थळावर उपस्थित नव्हते. ⁠ते सहकार्यांशी बोलले असतील तर त्यात चुकीचे काही नाही. सहकाऱ्यांशी ते बोलू शकतात. सरकारी वकीलांनी दिलेली कारणे पोलिस कोठडी देण्यासाठी पुरोशी नाहीत. ⁠आरोपींना कट रचला आहे तर त्यासाठी वेगळा गुन्हा दाखल करायला हवा होता. मूळ गुन्हा घडल्यानंतर हा कट रचल्याचा आरोप आहे.'

Pune Porsche Car Accident: पुणे ब्लड सॅम्पल फेरफार प्रकरण, दोन्ही डॉक्टरांसह शिपायाला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी
Pune Porsche Accident प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे Blood Sample बदलणाऱ्या त्या 4 व्यक्ती कोण? खळबळजनक खुलासा!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com