LPG Gas Cylinder black market
LPG Gas Cylinder black marketSaam TV

Pune LPG Gas Black Market: पुणेकरांनो तुमच्या घरी रिकामा गॅस तर येत नाही ना ? चिंता वाढवणारी बातमी

LPG Gas Cylinder Black Market: पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी
Published on

संजय जाधव

Latest Pune News : घरगुती गॅस संदर्भात पुणेकरांची चिंता वाढवणारी बातमी आहे.घरगुती गॅस सिलिंडरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने अटक केलीय.हे घरगुती सिलिंडरमधून गॅस चोरत होते.

घरगुती वापराच्या सिलेंडरमधील गॅस काढून तो व्यावसायिक सिलेंडर मध्ये भरून काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा पुणे (Pune) पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केलाय. पुण्यातील सिंहगड रस्ता परिसरातील वडगाव बुद्रुकमध्ये ही कारवाई करण्यात आली. (Latest Marathi News)

LPG Gas Cylinder black market
Chhatrapati Sambhaji Nagar : निलंबित पोलीस अधिकाऱ्याला महिलेला 'I Love You' म्हणणं पडलं महागात; जमावाने धु..धु.. धुतलं

ज्यांच्यावर घरोघरी गॅस देण्याची जबाबदारी होती त्यांनीच अशा प्रकारे गॅसचा हा काळाबाजार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एचपी गॅस व भारत पेट्रोलियम गॅस कंपनीचे घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो व्यावसायिक वापराच्या गॅस सिलेंडरमध्ये (Gas Cylinder)या ठिकाणी भरला जात होता.

खरंतर हा संपूर्ण प्रकार बेकायदा आणि धोकादायकही आहे. पोलिसांनी या ठिकाणाहून चार जणांना अटक केली असून ११४ गॅस सिलेंडर ही जप्त केले आहेत. दरम्यान, काही महिन्यांपूर्वी सातारा रस्त्यावरील एका गोदामात देखील अशाच प्रकारे बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून व्यावसायिक सिलेंडरमध्ये गॅस भरले जात होते.

LPG Gas Cylinder black market
Bhandara News : आई-वडिलांच्या पाया पडून म्हणाला, 'मला आशीर्वाद द्या'; घराबाहेर पडला तो परतलाच नाही

त्यावेळी या ठिकाणी मोठी आग लागली होती. अशा प्रकारचे धोकादायक काम कुठे सुरू असल्याचे आढळल्यास नागरिकांनी जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी असे आवाहनही पोलिसांकडून करण्यात आले. त्यामुळे पुणेकरांनो तुमच्या घरीही असा गॅस येत नाही ना याचीही खात्रजमा करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com