PMPML मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या फुकट्यांवर मोठी कारवाई; १३ लाखांचा दंड वसूल

PMPML च्या बसेस मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते, याच गर्दीचा फायदा घेत अनेकजण विना तिकीट प्रवास करतात.
Pune PMPML News
Pune PMPML NewsSaam TV

ज्ञानेश्वर हिंगोलीकर -

पुणे : पुण्यातील (Pune) नागरिकांचा प्रवास सुखकर करणाऱ्या पीएमपीएमएल मधून रोज लाखो प्रवासी प्रवास करत असातात. तर याच बसमधून अनेक फुकटे विना तिकीट प्रवास करत असल्याचं आता उघडं झालं आहे. शिवाय या फुकट्यांकडून तब्बल 13 लाखाचा दंड वसूल करण्यात आला आहे.

'PMPML' मधून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे रोज या बसेस मध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. मात्र, याच गर्दीचा फायदा घेत या बसमधून विना तिकीट प्रवास करणारे फुकट्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसतं आहे. कारण पीएमपीएमएल' मधून विना तिकीट प्रवास करणाऱ्या 4500 जणांवर एका महिन्यात मोठी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पाहा व्हिडीओ -

या कारवाईत फुकट्यांकडून तब्बल 13 लाख तीस हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे तर एका महिन्यात पकडलेले हे सर्वाधिक फुकटे असल्याचं पीएमपीएमएल प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे.

पिंपरी चिंचवड आणि पुणे शहरात पीएमपीएल कडून 1800 बसच्या माध्यमातून सार्वजनिक वाहतूक सेवा दिली जाते. दररोज 10 ते 12 लाख प्रवासी या बसने प्रवास करतात या प्रवाशांच्या तिकीट तपासणीसाठी 200 कर्मचारी कार्यरत आहेत. पी एम पी एल प्रशासनाने गेल्या आठ महिन्यात फुकट्यांकडून 75 लाखांचा दंड वसूल केला आहे. त्यामुळे तिकीट न काढता प्रवास करणाऱ्यांवर प्रशासनच चांगलाच वचक ठेवत असल्याचं दिसून येतं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com