नसरापूरनंतर पुन्हा पुणे हादरलं, पर्वतीत आजोबानेच केला घात

Nasrapur Case Echoes: राज्यात चिमुकलींवरील अत्याचाराच्या प्रकरणात दिवसेंदिवस वाढ होताना पाहायला मिळतेय. नसरापूरची घटना ताजी असतानाच आता पुणे आणखी एक घटनेनं हादरलंय. राज्यात नसरापूरची पुनरावृत्ती कशी टळलीय ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Locals gather in Parvati, Pune after a 70-year-old man was caught attempting to assault his minor granddaughter; police take the accused into custody.
Locals gather in Parvati, Pune after a 70-year-old man was caught attempting to assault his minor granddaughter; police take the accused into custody.saam tv
Published On

नसरापूरचं प्रकरण ताजं असतानाच पुणे पुन्हा एकदा हादरलंय.. पुण्यातल्या पर्वतीमध्ये नसरापूरची पुनरावृत्ती होता होता राहिली. 70 वर्षीय आजोबानं आपल्याच 9 वर्षांच्या नातीवर अत्याचाराचा प्रयत्न केलाय. मात्र,शेजाऱ्यांना मुलीचा आरडाओरडा ऐकू आल्यानं मोठा अनर्थ टळलाय. एव्हंढच नाहीतर घडलेल्या प्रकारानंतर नागरिकांच्या भावनांचा उद्रेक झाला आणि संतप्त नागरिकांनी आरोपीला थेट चोप दिला. पर्वतीमध्ये नेमकं काय घडलंय, पाहूयात...

पर्वतीत नेमकं काय घडलं?

नराधम आजोबा नातवंडांना भेटायला आला होता. आरोपीनं नातवाला पैसे देत खाऊ खाऊन ये असं सांगितलं. त्यानंतर पीडित नात एकटी असताना तिच्यावर अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, पत्र्याच्या घरात सुरू असलेला प्रकार शेजारील महिलेच्या लक्षात आला. इतकंच नाहीतर नात रडायला लागल्यावर नराधमानं तिला माळ्यावर ठेवलं. अखेर संतप्त नागरिकांनी आरोपी नराधम आजोबाला पकडून चोप दिला.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्यावर गुन्हाही दाखल केलाय... पीडितेच्या पालकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केलीय. तर पोलिसांनी मोर्चा न काढण्याचे आवाहन करत पीडित कुटुंबाची समजूत काढलीये.

दरम्यान, पर्वतीमधील प्रकरणानंतर नागरिकांमध्ये पुन्हा एकदा संतापाची लाट पसरलीये. या प्रकरणानंतर मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय... मात्र राज्यात वाढत्या लैगिक अत्याचारांच्या घटनांमागे नेमकी कोणती कारणं आहेत... तज्ज्ञांचे यावर काय म्हणणं आहे...पाहूयात...महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी थेट मृत्युदंडाची तरतूद करणारं विधेयक पारित केले. मात्र ते अजूनही केंद्राकडे प्रलंबित आहे. त्यामुळे राज्य सरकारनं अशा नराधमांना ठेचण्यासाठी तातडीने अशा कडक कायद्याची अंमलबजावणी करणं गरजेचं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com