Murlidhar Mohol On Supriya Sule: हे तुमच्या पचणी पडणारे नाही, मंत्रिपदावरून टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना मुरलीधर मोहोळांचे प्रत्युत्तर

Murlidhar Mohol Criticized Supriya Sule: मुरलीधर मोहोळ यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यांच्यावर निशाणा साधला होता. आता मुरलीधर मोहोळ यांनीच सोशल मीडियावर पोस्ट करत सुप्रिया सुळे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
Murlidhar Mohol On Supriya Sule: हे तुमच्या पचणी पडणारे नाही, मंत्रिपदावरून  टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना मुरलीधर मोहोळांचे प्रत्युत्तर
Murlidhar Mohol On Supriya Sule Saam Tv

'पुण्याला मंत्रिपद मिळालं त्याचा उपयोग पुण्याला व्हावा, कंत्राटदारांना नाही.', अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी नुकताच मंत्रीपद मिळालेल्या पुण्याच्या निवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ (Union Minister Murlidhar Mohol) यांच्यावर केली होती. सुप्रिया सुळे यांच्या या टीकेला मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत सुप्रिया सुळे यांना टोला लगावला आहे. 'हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही.', असा टोला त्यांनी लगावला आहे.

मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पोस्टमध्ये असे लिहिले आहे की, 'सुप्रियाताई शुभेच्छांबद्दल आपले मनःपूर्वक धन्यवाद. खरं तर जवळपास ४० वर्षांनंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे आणि पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच स्वागत अपेक्षित होतं. असो, पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.'

मुरलीधर मोहोळ यांनी या पोस्टमध्ये पुढे असे लिहिले की, 'ताई आपली ‘मळमळ’ आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो. उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही.'

Murlidhar Mohol On Supriya Sule: हे तुमच्या पचणी पडणारे नाही, मंत्रिपदावरून  टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना मुरलीधर मोहोळांचे प्रत्युत्तर
Supriya Sule on New Cabinet: अजित पवार गटाला केंद्रीय मंत्रिमंडळात एकही मंत्रिपद नाही; सुप्रिया सुळेंनी दिलेली प्रतिक्रिया चर्चेत

सुनील तटकरे यांना मंत्रीपद मिळालं नाही? यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे यांनी 'मैं दुसरो के घर में क्यू झांक्यू' असे विधान केले होते. यावेळी त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर देखील टीका केली. 'पुण्याला मंत्रिपद मिळालं, त्याचा उपयोग पुण्याला व्हावा, कंत्राटदारांना नाही, असे म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी नवनिर्वाचित केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली होती. तसंच, '50 खोके इज नॉट ओके असं कार्यकर्त्यांनी जनतेनं दाखवून दिलंय. धनशक्तीला जनतेनं नाकारलं आहे. ऑक्टोबरमध्ये धंगेकर पुन्हा आमदार होतील.', असे देखील त्यांनी सांगितले.

Murlidhar Mohol On Supriya Sule: हे तुमच्या पचणी पडणारे नाही, मंत्रिपदावरून  टीका करणाऱ्या सुप्रिया सुळेंना मुरलीधर मोहोळांचे प्रत्युत्तर
Pune Porsche Car Accident: विशाल अग्रवालच्या अडचणीत वाढ, आणखी एका प्रकरणात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com