Pune News
Pune News Saam Digital

Pune News : पुण्यात दोन पबवर महापालिकेने चालवला हातोडा; मोठं कारण आलं समोर

Pune Municipal Corporation : गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कल्याणीनगरमधील कारवाई करत‘एलरो’ आणि ‘युनिकॉर्न’ पब सील केले होते. त्यावर आता महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने हातोडा चालवत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं आहे.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कल्याणीनगरमधील कारवाई करत‘एलरो’ आणि ‘युनिकॉर्न’ पब सील केले होते. त्यावर आता महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने हातोडा चालवत अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त केलं आहे. पुणे पोलिसांनी या पबचे बेकायदा बांधकाम पाडण्यासाठी पुणे महापालिकेला पत्र दिले होते.यापूर्वी देखील मागील वर्षी दोन वेळा पत्र देण्यात आलेले होते.मात्र,महापालिकेकडून बोटचेपी भूमिका घेतली जात होती.मात्र, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कारवाई करण्याबाबत कडक धोरण आवलंबल्याने महापालिकेला कारवाई करावी लागली.

Pune News
Dhule Crime News : धुळे हादरलं! रस्त्यावरच पतीने गळा चिरून पत्नीला संपवलं

‘एलरो’ आणि ‘युनिकॉर्न’ हे पब रात्री दीडनंतर देखील पहाटेपर्यंत बेकायदेशीरपणे सुरू ठेवण्यात आलेले होते.याबाबत नागरिकांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पोलीस आयुक्तांच्या आदेशावरून गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ८ एप्रिल रोजी कारवाई करीत बेकायदा हुक्ह्यासह २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता.

Pune News
MHADA Lottery : म्हाडाच्या पंचतारांकित घरांसाठी लवकरच सोडत; या महिन्यात निघणार लॉटरी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com