MHADA Lottery : म्हाडाच्या पंचतारांकित घरांसाठी लवकरच सोडत; या महिन्यात निघणार लॉटरी

MHADA Lottery News : गोरेगाव पश्चिमेकडील पहाडी परिसरात माढा मार्फत प्रथमच पंचतारांकित 39 मजली निवासी इमारत बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी सर्व सोयी सुविधा रहिवाशांना उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
MHADA Lottery
MHADA LotterySaam Digital
Published On

मुंबईत स्वस्तात आणि सर्व सुविधा युक्त स्वतःच एक घर असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. हे स्वप्न आता लवकरच सत्यात उतरणार आहे. स्वस्तात मुंबईकरांना घरे उपलब्ध करून देणाऱ्या महाडा मार्फत मुंबईच्या गोरेगाव पश्चिमेकडील पंचतारांकित इमारतीतील घरांची लवकरच सोडत जाहीर केली जाणार आहे. गोरेगाव पश्चिमेकडील पहाडी परिसरात माढा मार्फत प्रथमच पंचतारांकित 39 मजली निवासी इमारत बांधण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असून या ठिकाणी सर्व सोयी सुविधा रहिवाशांना उपलब्ध करून दिला जाणार आहेत.

जलतरण तलाव इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन जिम आणि मैदानी अशा सर्व सुविधा म्हाडा कडून या इमारतीत उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जून 2024 अखेरपर्यंत या इमारतीचे काम पूर्ण होणार असून त्यानंतर लगेचच महाडा कडून या घरांसाठी सोडत जाहीर केली जाणार आहे 39 मजली इमारतीमध्ये एकूण 332 घरी उपलब्ध असणार असून ही घरे उच्च आणि मध्यम गटातील नागरिकांसाठी असणार आहेत.

MHADA Lottery
Mumbai Fire : मुंबईतील BKC परिसरातील सरकारी कार्यालयाला भीषण आग

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com