Pune News: पुणेकरांसाठी महत्वाची बातमी! जिल्ह्यातील CNG विक्री १० ऑगस्टपासून बंद; कारण काय?

CNG Sale Stop In Pune: जिल्ह्यातील सीएनजी पंपावरील विक्री 10 ऑगस्टपासून बेमुदत काळासाठी बंद होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना आत्ताच सीएनजी भरुन घ्यावे लागणार आहेत.
CNG News
CNG NewsSaam Tv
Published On

Pune CNG News: सीएनजीवरील वाहन चालवणाऱ्या पुणेकरांसाठी (Pune) एक महत्वाची बातमी समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील सीएनजी पंपावरील विक्री 10 ऑगस्टपासून बेमुदत काळासाठी बंद होणार आहे. त्यामुळे वाहन चालकांना आत्ताच सीएनजी भरुन घ्यावे लागणार आहेत. (Pune Latest News)

CNG News
Nandurbar Dara Dam News : सातपुड्याच्या डोंगररांगात पावसाचा जाेर, निसर्गाच्या प्रेमात राहा पण..., पर्यटकांना प्रशासनाचे आवाहन

याबाबत अधिक माहिती अशी की, कमिशनमधील वादाबाबत समाधानकारक तोडगा न निघाल्यामुळे जिल्ह्यातील सीएनजींचे 42 पंप 10 ऑगस्टपासून बेमुदत बंद राहणार आहेत. पेट्रोल डिलर असोसिएशन ऑफ पुणे यांच्याकडून याबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना निवेदन दिले आहे.

पुणे जिल्ह्यातील विक्रेत्यांना टोरेंट कंपनीकडून गॅस पुरविला जातो. या कंपनीकडे कमिशनच्या सुधारित दराची 42 पंपचालकांची 16 महिन्यांची एकूण 9 कोटी 27 लाख रुपयांची थकबाकी आहे. यामुळे पंपचालकांनी सीएनजी विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

CNG News
Jitendra Awhad News: माफ करा; मी अस्वस्थ आहे... भावनिक ट्वीट करत जितेंद्र आव्हाड अज्ञातस्थळी; राजकीय वर्तुळात चर्चा!

याबाबत तत्कालीन अन्यधान्य पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात दोन बैठका झाल्या. परंतु त्यात झालेल्या निर्णयांची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे पंपचालक सीएनजी विक्री 10 ऑगस्टपासून बंद ठेवणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष ध्रुव रूपारेल यांनी सांगितले आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com