Pune Police News: पुणे पोलिस आयुक्तांचा दणका! आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह ७ जणांचे निलंबन; काय आहे प्रकरण?

Pune Police Inspector, 3 PSI Suspended: या धडाकेबाज कारवाईने पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
Warje Malwadi Police Station
Warje Malwadi Police StationSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Police News: पुण्यातील सदाशिव पेठ परिसरात तरुणीवर झालेल्या कोयता हल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरुन गेला होता. या धक्कादायक प्रकारानंतर सहकारनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षकासह ७ जणांना निलंबित केले होते.

यानंतर आता पुणे पोलिस आयुक्तांनी वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षकासह सात जणांना निलंबित केले आहे. कामामध्ये हलगर्जीपणा केल्याने तसेच कर्तव्य न पार पाडल्याने ही मोठी कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. (Pune Latest News)

Warje Malwadi Police Station
Loksabha Election 2023 : रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला? उद्योगमंत्री उदय सामंत यांचे सुतोवाच

याबाबत अधिक माहिती अशी की, पुणे पोलिस आयुक्तांनी वारजे माळवाडी पोलिस (Warje Malwadi Police Station) ठाण्यातील त्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह 7 जणांना निलंबीत केले आहे. मोक्का कारवाई बाबत संदिग्ध व अत्यंत मोघम अहवाल देवून वरिष्ठांची दिशाभूल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. या धडाकेबाज कारवाईने पुणे पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.

वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडु सायप्पा हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलिस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलिस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर, पोलिस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Warje Malwadi Police Station
Samruddhi Mahamarg Accident: 'अम्मी जा रही हूँ', जोयाचे ते शब्द ठरले शेवटचे

दरम्यान, सदाशिव पेठ (Sadashiv Peth) परिसरातील कोयता हल्ल्यातील मुख्य आरोपी शांतनू जाधव याची येरवडा कारागृहात (Yerwada Jail) रवानगी करण्यात आली आहे. प्रेमसंबंध संपविण्याच्या रागातून त्याने २७ जून रोजी सकाळी तरुणीवर जीवघेणा हल्ला केला होता. आरोपीने सदाशिव पेठेतील पेरुगेट पोलिस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करीत तिला जिवे मारण्याचा प्रयत्न केला मात्र दोन युवकांच्या सतर्कतेने तिचे प्राण वाचले होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com