Pune Accident: पुण्यातील भूमकर पुलावर टँकरचा अपघात; दुर्घटनेमुळे वाहनांच्या लागल्या लांबच लांब रांगा

अपघात कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.
Pune Accident
Pune AccidentSaam tv
Published On: 

Pune Accident News: पुणे अपघाताचं वृत्त हाती आलं आहे. टँकरचे गिअर तुटल्यामुळे आणि ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला आहे. पुण्यातील भूमकर पुलाजवळ टँकरजवळ हा अपघात झाला आहे. या अपघात कोणत्याही जीवितहानी झालेली नाही. या अपघातामुळे वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, खोबऱ्याचे तेल घेऊन जात असलेल्या टँकरचा अपघात झाला आहे. टँकरचा गिअर तुटल्यामुळे तसेच ब्रेक निकामी झाल्याने हा अपघात घडला आहे. या अपघातामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणावर तेल सांडले आहे.

फायर ब्रिगेड घटनास्थळी दाखल झाले असून कुठली ही जिवीतहानी झालेली नाही. या अपघातामुळे मात्र मुंबई बेंगलोर महामार्गावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत.

नेमका कसा अपघात झाला?

हा टँकर साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने चालला होता. पुण्यातील भूमकर पुलाजवळ हा टँकर आला असता ड्रायव्हरला टँकरचे गिअर तुटल्याचे लक्षात आले. तसेच ब्रेक निकामी झाले असल्याने हा अपघात झाला.

सध्या अग्निशमन दलाकडून रस्तावरील सांडलेले तेल काढण्याचे काम सुरू आहे. अपघात रोखण्यासाठी तसेच रस्ता साफ करण्यासाठी पाण्याचे फवारे मारले जात आहेत.

रत्नागिरीच्या आंबोली घाटातील खोल दरीत गाडी कोसळली

रत्नागिरीच्या आंबोली घाटात खोल दरीत टेम्पो कोसळून चंदगड येथील चालक जागीच ठार झाला. ही घटना काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली. पुंडलिक आसगावकर (वय- २९, राहणार, कोल्हापूर (kolhapur) , चंदगड (chandgad), मांडवळे) असे त्याचे नाव आहे. (Maharashtra News)

आसगावकर हा गोवा (goa) येथे काजू बोंडू देण्यासाठी गेला होता. तेथून परतत असताना वळणाचा अंदाज न आल्याने हा अपघात घडला. घटनास्थळी पोलीस दाखल झाल्यानंतर आंबोली रेस्कु टिमच्या मदतीने आसगावकर याचा मृतदेह बाहेर काढण्यास यश आले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.