Mohan Bhagwat Speech: देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य

RSS Chief Mohan Bhagwat Latest News: पुण्यामध्ये पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक कै. शंकर दिनकर तथा भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
Mohan Bhagwat Speech: देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य
Mohan BhagwatSaam TV
Published On

सागर आव्हाड, पुणे|ता. ६ सप्टेंबर २०२४

Mohan Bhagwat Speech Pune: 'मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या,’ असे म्हणत सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच ‘क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखे कधी होऊ नये. चमकणे डोक्यात जाते. त्यामुळे वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत, जळत राहावे,’ असा ‘सल्ला’ही त्यांनी यावेळी दिला. पुण्यामधील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

Mohan Bhagwat Speech: देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य
Pune Ganeshotsav 2024: पुण्यनगरी सजली! ढोल ताशांचा गजर अन् ऐतिहासिक देखावे; ५ मानाच्या गणपतींची वैभवशाली परंपरा, यंदाची तयारी कशी? जाणून घ्या..

पुण्यामध्ये पूर्व सीमा प्रतिष्ठानच्या वतीने संघाचे स्वयंसेवक आणि प्रचारक कै. शंकर दिनकर तथा भय्याजी काणे जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह प्रतिष्ठानचे सचिव जयवंत कोंडविलकर, रा. स्व. संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे संघचालक नाना जाधव यांच्यासह बांधकाम विकासक नितीन न्याती या वेळी उपस्थित होते. संघाच्या विविध स्वयंसेवक आणि प्रचारकांनी केलेल्या देदीप्यमान कार्याचा गौरव करताना डाॅ. भागवत यांनी उपस्थितांनी मार्गदर्शन केले.

काय म्हणाले मोहन भागवत?

'आपलं जीवन जितकं चांगलं करता येईल तितके करावे. प्रत्येकाने देववाद झालं पाहिजे. मात्र मी देव झालो, असे स्वत: म्हणू नये. तुमच्यातील देवत्व लोकांना ठरवू द्या. क्षणभर चमकणाऱ्या विजेसारखे कधी होऊ नये. चमकणे डोक्यात जाते. त्यामुळे वीज होऊन चमकण्यापेक्षा पणती होऊन तेवत, जळत राहावे,' असे मोहन भागवत यावेळी म्हणाले.

Mohan Bhagwat Speech: देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य
Maharashtra Politics : दादांचा वादा अन् अनाथांचा नाथ, लाडक्या बहिणींवरून कॅबिनेट बैठकीत मोठा राडा, पाहा VIDEO

या कार्यक्रमात बोलताना मोहन भागवत यांनी मणिपूरमधील हिंसाचारावरुनही महत्वाचे विधान केले. "मणिपूरमध्ये परिस्थिती गंभीर आहे कारण तेथे सुरक्षा नाही. स्थानिक नागरिकही त्यांच्या सुरक्षिततेबाबत चिंतेत आहेत. तिथे व्यावसायासाठी किंवा कामासाठी गेलेल्या नागरिकांसमोर मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीतही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक उभे आहेत. तिथून पळून गेले नाहीत. ते पक्षभेद विसरुन सर्वांसाठी काम करत आहेत," असा दावा त्यांनी केला.

Mohan Bhagwat Speech: देव झालो, असे स्वत: म्हणू नये; सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे वक्तव्य
Badlapur Crime: मित्रांमध्ये पैशातून वाद अन् गोळीबाराचा थरार, बदलापूर फायरिंग प्रकरणात मोठा खुलासा, १ अटकेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com