Sinhagad Landslide : सिंहगडावर जाण्याचा प्लान करताय... थांबा! आधी ही बातमी वाचाच

Pune Latest News Updates : पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सिंहगडावर जाण्याचा प्लान करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे.
Sinhagad Fort Latest News
Sinhagad Fort Latest Newssaam tv
Published On

>> सचिन जाधव, साम टीव्ही

Sinhagad Fort Latest News: पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तुम्ही सिंहगडावर जाण्याचा प्लान करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. सिंहगड किल्ल्याच्या घाट रस्त्यावर सोमवारी पहाटेच्या सुमारास दरड कोसळल्याची घटना घडली आहे.

याशिवाय पाच ते सहा ठिकाणी धोकादायक दरडींचे दगडगोटे उन्मळून रस्त्यावर आले आहेत. सुदैवाने पहाटेच्या सुमारास गर्दी नसताना ही घडली. त्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली नाही. तसेच पुणे दरवाजा पायी मार्गावरही दरडी कोसळण्याचा धोका वाढला आहे.

Sinhagad Fort Latest News
Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे CM शिंदेंना मोठा धक्का देण्याच्या तयारीत, सुप्रीम कोर्टात दाखल केली याचिका

दरड कोसळ्याच्या या घटनांमुळे सिंहगडावर येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वादांमुळे घाट रस्त्यावरील दरडी संरक्षित करण्याचे काम गेल्या वर्षीपासून रखडले आहे. (Breaking News)

रविवारी सिंहगडावर वीस हजारांहून अधिक पर्यटकांनी गर्दी केली होती. सकाळपासून रात्री आठपर्यंत घाट रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तेव्हा दरड कोसळण्याची घटना घडली असती, तर मोठी दुर्घटना घडली असती. (Latest Political News)

Sinhagad Fort Latest News
Mumbai-Agra Highway Accident: धुळ्यामध्ये भरधाव कंटेनर हॉटेलमध्ये घुसला, 13 जणांचा मृत्यू; 20 ते 25 जण जखमी

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या ठिकाणी घाट रस्त्यावर तसेच गडाच्या पायी मार्गावर वनविभागाने सुरक्षा रक्षक तैनात केले आहेत. घाट रस्त्याप्रमाणे वाहनतळावरून गडावर जाणार्‍या पुणे दरवाजा पायी मार्गावरही दरड कोसळण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे पर्यटकांनी येथून जाताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com