Pune News: मानसिक संतुलन ठीक नाही, आत्महत्या करेन... विद्यार्थ्याचे थेट कुलगुरूंना पत्र; पुण्यात खळबळ

पुढे शिक्षण घेण्यासाठी अडचण येत असल्याने हताश झालेल्या या तरुणाने हे पाऊल उचलले...
Pune News
Pune NewsSaamtv
Published On

अक्षय बडवे, प्रतिनिधी...

Pune Crime News: पुणे शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. "टी सी" वर रेड रिमार्क दिल्यामुळे विद्यार्थ्याने थेट विद्यापीठाच्या कुलगुरूंना आत्महत्येचे पत्र लिहल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुशांत शेवाळे असे या पत्र लिहणाऱ्या तरुणाचे नाव आहे. (Crime News In Marathi)

Pune News
Maharashtra Politics: महाविकास आघाडी एकत्र लढणार? काँग्रेसची भूमिका स्पष्ट; आता उद्धव ठाकरेंच्या भूमिकेकडे लक्ष

काय आहे संपूर्ण प्रकरण?

याबाबत अधिक माहिती अशी की, सुशांत शेवाळे (Sushant Shewale) हा तरुण (Pune) शहरातील एका नामांकित कॉलेजमध्ये शिक्षण घेत होता. मात्र परीक्षा देऊनसुद्धा निकाल त्याच्या हाती कॉलेजने दिला नाही. काही दिवसांनी त्याला कॉलेजने त्याचा निकाल हाती दिला.

मात्र कॉलेज सोडून जाताना टी सी देताना कॉलेज ने टीसीवर "misbehaviour" असा शेरा दिला. त्यामुळेच त्यासा पुढे शिक्षण घेण्यासाठी अडचण येत असल्याने हताश झालेल्या या तरुणाने कुलगुरू यांनी याप्रकरणी दखल घ्यावी यासाठी पत्र लिहल्याचे समोर आले आहे. (Crime News)

Pune News
Congress आमदारांचे Mahavitran च्या कारभारा विराेधात बेमुदत उपाेषण सुरु

या पत्रामध्ये तरुणाने मानसिक संतुलन ठीक नसल्याने योग्य दखल घेतली नाही तर आत्महत्या करेल आणि जबाबदारी कॉलेजची असेल.. अशी थेट धमकी मुलाने दिली. ज्यामुळे एकच खळबळ उडाली. मुलाने २६ जून रोजी हे लिहल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण समोर आले. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com