Corona Update
Corona Update Saam Tv

Pune News : पुण्यात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटची एन्ट्री; प्रशासनाकडून Alert जारी

ऐन दिवाळीचा सण तोंडावर असताना पुण्यातून (Pune) एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.

ज्ञानेश्वर हिंगोलीकर, साम टीव्ही

Coronavirus New Variant in Pune : ऐन दिवाळीचा सण तोंडावर असताना पुण्यातून (Pune) एक चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. पुण्यात कोरोनाच्या नव्या (Corona Virus) व्हेरियंटने शिरकाव केला आहे. कोरोनाचा BQ.1 हा नवा व्हेरियंट पुण्यात सापडला आहे. भारतातील हे पहिलं प्रकरण असल्याने आरोग्य प्रशासनाची चिंता वाढवली आहे. (Pune News Today)

Corona Update
Corona Virus : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने चिंता वाढवली; ही लक्षणे दिसताच वेळीच सावध व्हा!

गणेशोत्सवानंतर यंदाची दिवाळीही धूमधडाक्यात करण्याची तयारी सुरू झाली आहे. अशातच पुण्यात कोरोनाच्या BQ.1 नव्या व्हेरियंटने शिरकाव केला आहे. हिवाळा, सणवार त्यात कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेने धास्ती घेतली आहे. महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने अलर्टही जारी केला आहे.

दिवाळीआधीच कोरोनाने आपलं खतरनाक रूप दाखवायला सुरुवात केली आहे. एकीकडे देशात कोरोनाचा नव्या सब व्हेरियंट BF.7 ने शिरकाव केला असतानाच, आता दुसरीकडे पुण्यातही कोरोनाच्या BQ.1 नव्या व्हेरियंटने एन्ट्री केली आहे.

Corona Update
Aryan Khan Case : आर्यन खान प्रकरणाच्या तपासात अनेक त्रुटी; NCB अधिकारीच गोत्यात!

चिंताजनक बाब म्हणजे कोरोनाविरोधातील इम्युनिटीलाही हा व्हेरियंट जुमानत नाहीत, अशी सुद्धा माहिती समोर येत आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर शहरात कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने शिरकाव केल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. रिपोर्टनुसार BQ.1, BQ.1.1 हे व्हेरिएंट BA.5 व्हेरिएंटचे सब व्हेरिएंट आहेत. हे खूप खतरनाक आहेत.

आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात कोरोना प्रकरणांमध्ये 17.7% वाढ झाली आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने यासाठी कोरोनाचा BF.7 आणि XBB व्हेरियंट जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. कोरोनाचा हा नवा व्हेरियंट वयस्कर आणि इतर आजारांनी ग्रस्त असेलल्यांसाठी जास्त धोकादायक ठरू शकतो, असं सांगितलं जातं आहे.

Edited By - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com